Terrorists Twitter / ANI
देश

Jammu And Kashmir: दहशतवाद्याचा कबुलनामा, हल्ल्यासाठी पाकिस्तानी लष्कराने पाठवले

Jammu And Kashmir: राजौरीमध्ये एलओसीजवळ पकडलेल्या दहशतवाद्याने मोठी कबुली दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir: राजौरीमध्ये एलओसीजवळ पकडलेल्या दहशतवाद्याने मोठी कबुली दिली आहे. तबराक हुसेन नावाच्या या दहशतवाद्याने कबूल केले की, 'आम्हाला पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्याने भारतीय सैन्यांवर हल्ला करण्यासाठी पाठवले होते. त्यासाठी 30 हजार रुपयांचे आमिष देण्यात आले होते. हल्ला करण्यासाठी मी एकटा आलो नव्हतो. माझ्याबरोबर चार-पाच जण होते. आम्ही मोठ्या हल्ल्याची योजना आखली होती.' लष्कराच्या चौकीवर फिदाईन हल्ल्याची पूर्ण तयारी झाली होती, असेही त्याने आपल्या कबुलीजबाबात सांगितले.

दरम्यान, 21 ऑगस्ट रोजी नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करताना दहशतवादी (Terrorists) तबराक हुसैन पकडला गेला. सतर्क सुरक्षा दलांनी त्याला पाहताच गोळीबार केला. त्यानंतर जखमी अवस्थेत हाती लागलेल्या तबरकला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. तबराक म्हणाला की, 'आयएसआयचे (ISI) कर्नल चौधरी युनूस यांनी माझ्यावर नियंत्रण रेषेवरील लष्करी चौकी पुन्हा घेण्याची जबाबदारी सोपवली होती. या कामासाठी मला 30 हजार रुपये देण्यात आले होते.' यानंतर 21 ऑगस्टला तो एका पोस्टवर फिदाईन हल्ला करणार होता, परंतु घुसखोरीपूर्वीच तो पकडला गेला.

तबराक पुढे म्हणाला की, 'आपल्याला चार-पाच बंदुकाही दिल्या होत्या.' गोळीबारादरम्यामान त्याने आपल्या साथीदारांना मदतीसाठी बोलावले परंतु कोणीही येऊ शकले नाही. आपल्याला सैनिकांवर (Soldiers) फिदाईन हल्ला करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT