Farmer Protest in Delhi File Photo Dainik Gomantak
देश

Kisan Mahapanchayat: दिल्लीत 'या' दिवशी पुन्हा जमणार लाखो शेतकरी; संसदेबाहेर किसान महापंचायत

अर्थसंकल्प शेतकरी विरोधी असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे मत

Akshay Nirmale

Kisan Mahapanchayat: केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीत सुमारे वर्षभराचा काळ चाललेल्या शेतकरी आंदोलनामुळे संपुर्ण देशाचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण ढवळून निघाले होते. आता पुन्हा शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक देण्याचे ठरवले आहे.

संयुक्त किसान मोर्चा या शेतकरी संघटनेची गुरूवारी बैठक झाली. त्यात अनेक मुद्यांवर चर्चा झाली. त्यानुसार किमान हमीभावाच्या मागणीसाठी दिल्लीत पुन्हा शेतकरी एकत्रित येत एल्गार करणार आहेत.

युधवीर सिंग, राजा रामसिंग आणि डॉ. सुनील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत अनेक शेतकरी संघटनांनी या विषयावर चर्चा केली.

संयुक्त किसान मोर्चातर्फे सांगण्यात आले की, किमान हमीभावासाठी कायदेशीर हमी देण्याची आमची मागणी आहे. या मागणीसाठी २० मार्च रोजी संसदेबाहेर 'किसान महापंचायत' आयोजित केली जाईल.

दरम्यान, बैठकीत संयुक्त किसान मोर्चाने अर्थसंकल्पावर टीका करत हा 'शेतकरी विरोधी' असल्याचे म्हटले आहे. त्यांनी विद्यमान केंद्र सरकारवर इतरही अनेक आरोप केले.

युनायटेड किसान मोर्चाचे ज्येष्ठ नेते युधवीर सिंग यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्यास भाग पाडले जात आहे. यावेळी 20 मार्च रोजी देशभरातील शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत.

यापूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही. अशा परिस्थितीत प्रथम 20 मार्च रोजी दिल्लीत महापंचायत होणार आहे.

यानंतर मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जाईल. 31 सदस्यीय समितीही स्थापन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या...

संयुक्त किसान मोर्चा सरकारकडे अनेक मागण्या करत आहे. यासाठी पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू आहे. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी, कर्जमाफी, लखीमपूर प्रकरणातील केंद्रीय मंत्र्याला पदावरून हटवा, शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा, एमएसपी लागू करा, या मागण्या संयुक्त किसान मोर्चाच्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT