Ladakh Dainik Gomantak
देश

Ladakh: मुसळधार पावसाचा 'तांडव' सुरूच, लेहमध्ये ढगफुटीचा कहर, पाहा व्हिडिओ

लडाखच्या लेहमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे.

Puja Bonkile

Ladakh Cloudburst: पावसामुळे देशभरात मोठे नुकसान झाले आहे. तर काही राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती आल्यासारखा पाऊस पडत आहे. लडाखच्या लेहमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ढिगारा बाजुला करण्याचे काम सुरू आहे. लडाखमधील हा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

मुख्य बाजारपेठेपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या होरजी गावाला ढगफुटीचा फटका बसला. पाणी आणि चिखल रहिवासी भाग आणि मुख्य बाजारपेठेच्या दिशेने आले. त्यामुळे रात्रीच्या वेळी लोकांना घरे सोडून रस्त्यावर यावे लागले.

मुसळधार पावसानंतर भूस्खलन झाल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्री उशिरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर ढिगारा साचला आहे. पोलिस व प्रशासनाचे पथक रस्त्यावर साचलेला ढिगारा हटवून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे.

लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, काल रात्री, विनाशकारी पुरामुळे शक्ती-वारिला-अघम रस्त्याचे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या हिमांकच्या टीमने आज तातडीने रस्त्यांची देखभाल करण्याची सुरूवात केली आहे.

अधिका-यांनी सांगितले की, हा रस्ता जलदगतीने पुर्ववत करण्यासाठी आणि सर्वांसाठी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी टीम मेहनत घेत आहे. प्रवाशांना सध्या या रस्त्यावरून प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लेहमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे शहर पाण्याखाली गेले आहे. अद्याप कोणताही जावितहानी झाल्याची माहिती नसून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

  • उत्तरकाशीत ढगफुटी

दुसरीकडे, उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. बरकोट येथील गंगनानी परिसरात ढगफुटीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता. ढगफुटीमुळे अनेक हॉटेल, घरे आणि वाहनांचे नुकसान झाले. ढगफुटीमुळे गंगनानी यांच्या शाळेला पूर आला. एसडीआरएफच्या टीमने घटनास्थळी पोहोचून मुलांना शाळेतून बाहेर काढले. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद करण्यात आला असून यमुनोत्री यात्रा थांबवण्यात आली आहे.

हवामान विभागानूसार, शनिवारी (22 जुलै) पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता आहे. 

याशिवाय लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूह, मध्य प्रदेश, गुजरात, कोकण-गोवा आणि कर्नाटक किनारपट्टीच्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT