Kurnool bus fire Dainik Gomantak
देश

Kurnool Bus Fire: खासगी बस आगीत जळून खाक, 20 प्रवाशांचा मृत्य़ू झाल्याची भीती, अनेकजण जखमी; धडकी भरवणारा Video, Photo समोर

Andhra Pradesh bus accident: आंध्रप्रदेशातील या अपघाताप्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे.

Pramod Yadav

आंध्रप्रदेश: कुर्नूल चिन्नातेकूर परिसरात खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याने २० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर, १२ हून अधिकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हैद्राबाद - बंगळुरु दरम्यान जाणाऱ्या कावेरी ट्रॅव्हल्समध्ये पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडला. बसमध्ये ४० ते ४२ प्रवासी प्रवास करत असल्याची माहीती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबाद ते बंगळुरु दरम्यान धावणाऱ्या कावेरी ट्रॅव्हल्समध्ये पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास आग लागली. दुचाकी महामार्गावर घसरुन बसच्या इंधन टाकीला धडकली यामुळे टाकीचा स्फोट झाल्याने बसला आग लागली. आग एवढी भीषण होती की बसमधील २० हून अधिक प्रवाशांचा जळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तसेच, १२ प्रवासी जखमी झाल्याचे माहिती समोर आली आहे. काहीजण सुरक्षितपणे बाहेर पडल्याचेही सांगितले जाते. दरम्यान, पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातावेळी अनेकजण झोपेत होते. त्यामुळे आग लागल्यानंतर लगेच बाहेर पडता आले नाही.

या अपघातातबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातात जखमी झालेले लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना त्यांनी केली.

बस लाग लागल्यानंतर काही क्षणातच आगीने संपूर्ण बसचा ताबा घेतला. आगीचे भीषण लोळ हवेत जाताना दिसत होते. दरम्यान, यावेळी बसमधील प्रवासी मदतीसाठी याचना करत होते, बसमधून किंचळण्याचे आवाज येत होते. बसला आग लागताच बस चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT