Kulgam Encounter Jammu and Kashmir Dainik Gomantak
देश

कुलगाममधील CRPF पथकावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भटसह दोन दहशतवादी चकमकीत ढेर

Kulgam Encounter Jammu and Kashmir: दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील लारु भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

Manish Jadhav

Kulgam Encounter Jammu and Kashmir: दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील लारु भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यामध्ये कुलगाम परिसरातील लष्कराचा शेवटचा सक्रिय कमांडर लतीफ भट याचाही समावेश आहे. सीआरपीएफच्या पथकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन या भागात सुरु होते, ज्याला मोठे यश आले.

बुधवारी (11 नोव्हेंबर) कुलगाममधील अखरान गावात मोटारसायकलवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर अचानक हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी अवघ्या 15 सेकंदांत तब्बल 30 राऊंड फायरिंग केली होती. या भीषण हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरुन फरार झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करत संयुक्त शोध मोहीम तीव्र केली होती. सलग सहाव्या दिवशीही लारु परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेरुन त्यांचा खात्मा केला.

या चकमकीत मारला गेलेला लतीफ भट हा दक्षिण काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबाचा अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा सक्रिय कमांडर मानला जात होता. त्याच्या खात्म्यामुळे परिसरातील दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला.

सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मोहम्मद लतीफ भटने कॉलेज सोडून सुतारकाम करण्यास सुरुवात केली होती. नोव्हेंबर 2025 मध्ये तो अचानक घरातून गायब झाला, त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी 19 नोव्हेंबर 2025 रोजी कुलगाम पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासात समोर आले की, घर सोडल्यानंतर तो दहशतवादी झाकीर अहमद घनीच्या संपर्कात आला, दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि कुलगाम व शोपियानच्या वरच्या भागात शस्त्र प्रशिक्षण घेतले. जुलै 2026 मध्ये शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत त्याचा साथीदार झाकीर घनी मारला गेल्यानंतर, लतीफ सुरक्षा दलांचा वेढा तोडून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र आता, सुरक्षा दलांनी राबवलेल्या ऑपरेशनमध्ये त्याचा खात्मा झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajat Patidar Century: 13 षटकार, 8 चौकार, 281 चा स्ट्राईक रेट! तडाखेबंद शतक ठोकून रजत पाटीदारने रचला नवा इतिहास; गोलंदाजांची उडवली झोप

मुंबईत रंगला 'गली क्रिकेट'चा थरार! प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनला क्रिकेटच्या देवाने दिले फलंदाजीचे धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक महामुकाबला! हिसाब चुकता करण्यास टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

VIDEO: पाकड्यांनी पुन्हा कॉपी केला भारतीय शो! समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'नंतर आता 'पाकिस्तान गॉट लेटेंट'ची चर्चा; राखी सावंतच्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT