Kuldeep Yadav Dainik Gomantak
देश

Asia Cup 2025 Final: कुलदीप यादवनं रचला इतिहास! लसिथ मलिंगाचा मोडला मोठा रेकॉर्ड; पाकिस्तानी फलंदाजांना केलं ढेर VIDEO

Kuldeep Yadav Reocord: पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 आशिया कप फायनलमध्ये कुलदीप यादवने आपल्या 4 षटकांमध्ये केवळ 30 धावा देत 4 महत्त्वपूर्ण बळी घेतले.

Manish Jadhav

Kuldeep Yadav Reocord: भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 आशिया कप 2005 चा अंतिम सामना सध्या खेळला जात आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सुरुवातीला पाकिस्तानचे फलंदाज साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी भारतीय गोलंदाजांवर चांगली पकड मिळवली.

परंतु, त्यानंतर भारतीय फिरकी गोलंदाजांनी सामन्यात शानदार पुनरागमन करत पाकिस्तानच्या फलंदाजीला बॅकफूटवर ढकलले. भारतीय फिरकीच्या जाळ्यात पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे अडकले आणि त्यांची फलंदाजी 146 धावांवरच संपुष्टात आली. या सामन्याचा सर्वात मोठा हिरो ठरला, तो म्हणजे भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव.

कुलदीप यादवने घेतले चार बळी

पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 आशिया कप फायनलमध्ये कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आपल्या 4 षटकांमध्ये केवळ 30 धावा देत 4 महत्त्वपूर्ण बळी घेतले. कुलदीपच्या फिरकीसमोर पाकिस्तानी फलंदाजांना फारशी कमाल दाखवता आला नाही. कुलदीपने सॅम अयुब, सलमान अली आगा, शाहीन आफ्रिदी आणि फहीम अशरफ या प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या जबरदस्त कामगिरीमुळे कुलदीपने केवळ भारतालाच मजबूत स्थितीत आणले नाही, तर त्याने एक मोठा आंतरराष्ट्रीय विक्रमही आपल्या नावावर केला.

लसिथ मलिंगाचा मोडला विक्रम

कुलदीपने या सामन्यात 4 बळी घेतल्यानंतर आशिया कपच्या (एकदिवसीय आणि टी-20 दोन्ही फॉरमॅट) इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा याचा विक्रम मोडला. कुलदीप यादवच्या नावावर आता आशिया कपमध्ये एकूण 35 विकेट्स झाल्या. यापूर्वी, मलिंगाने आशिया कपमध्ये 32 बळी घेतले होते. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कुलदीपने आता सर्व गोलंदाजांना मागे टाकत क्रमांक-1 चे स्थान मिळवले.

फिरकी त्रिकूटाचे वर्चस्व

त्याचवेळी, या फायनल सामन्यात केवळ कुलदीपच नाही, तर इतर भारतीय फिरकीपटूंनीही आपला जलवा दाखवला. वरुण चक्रवर्तीने आपल्या 4 षटकांमध्ये 30 धावा देत 2 बळी घेतले, तर अक्षर पटेलने 4 षटकांत केवळ 26 धावा देत 2 बळी घेतले. कुलदीप यादवच्या 4 बळींसह भारतीय फिरकी त्रिकुटाने मिळून पाकिस्तानचे 8 फलंदाज तंबूत धाडले. याच अप्रतिम सांघिक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचा (Pakistan) संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 146 धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताला आता हा ऐतिहासिक अंतिम सामना जिंकण्यासाठी 147 धावांचे आव्हान पार करायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT