West Bengal Crime Dainik Gomantak
देश

West Bengal Crime: रॅगिंगचा बळी ठरला स्वप्नदीप! कधी नग्नावस्थेत धावायला लावायचे तर कधी...

Jadavpur University: कोलकाता जाधवपूर विद्यापीठात प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूवरुन राज्यात खळबळ उडाली आहे.

Manish Jadhav

Jadavpur University: कोलकाता जाधवपूर विद्यापीठात प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूवरुन राज्यात खळबळ उडाली आहे.

बंगाली पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या स्वप्नदीप कुंडूच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे.

पोलिसांनी गुरुवारी रात्रभर विद्यार्थ्यांची चौकशी केली. विद्यार्थ्यांच्या चौकशीत स्वप्नदीपच्या मृत्यूमागे रॅगिंगचे कारण असल्याचे पुढे आले आहे.

मृत विद्यार्थ्याला नग्नावस्थेत धावायला लावल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. त्याला 'गे' म्हणून संबोधले जायचे. यादरम्यान मयत विद्यार्थ्याने आईला अनेकदा फोनही केला होता.

दरम्यान, स्वप्नदीपने रॅगिंगबाबत चर्चा करुन हे रॅगिंग कधी थांबणार, असे विचारल्याचे त्याच्या काही वर्गमित्रांनी सांगितले. स्वप्नदीपने त्याला झोप येत नसल्याचे सांगितले होते.

रॅगिंगमुळे तो अस्वस्थ झाला असावा. कोलकाता पोलिसांनी (Police) जाधवपूर घटनेतील विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे कलम 302 म्हणजेच खून आणि कलम 34 जोडून तपास सुरु केला.

तपास पथकाने नादियाला भेट दिली असून स्वप्नदीपच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून त्याच्याबद्दल अधिक जाणून घेतले आहे.

जाधवपूर विद्यापीठातील प्रथम वर्षात शिकणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याने स्वप्नदीपच्या मृत्यूनंतर फेसबुकवर सांगितले की, त्यानेही वसतिगृहात "भयंकर" रात्र काढली. रॅगिंगचा आरोप करत त्यांनी लिहिले की, “संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वसतिगृहात जाण्याचे आदेश, ‘इंट्रो’ घेण्यासाठी रात्रभर जागावे लागत. मला पण भीती वाटते."

स्वप्नदीपच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, स्वप्नदीपने बुधवारी संध्याकाळी अनेक वेळा आईला फोन करुन जीवाची भीती व्यक्त केली होती.

दुसरीकडे, बुधवारी रात्री उशिरा स्वप्नदीपचा वसतिगृहाच्या टेरेसवर धावायला लावल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. गुरुवारी संध्याकाळी स्वप्नदीपच्या पोस्टमार्टम रिपोर्टची माहिती तपासकर्त्यांना देण्यात आली.

स्वप्नदीपचा मृत्यू कसा झाला, त्या रात्री नेमकं काय घडलं याचा शोध घेण्यासाठी जाधवपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरु केला आहे. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु करण्यात आला आहे.

गुरुवारी पोलिसांसह लालबाजार गुप्तचर विभागाचे अधिकारीही वसतिगृहात गेले. तिथे विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यात आली. वसतिगृहातील तीन विद्यार्थ्यांना (Students) पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. तिथे त्यांचे जबाब नोंदवण्यात आले.

वसतिगृहातील 'रॅगिंग'मुळे हा मृत्यू झाल्याचे स्वप्नदीपच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याच्या काकांनी सांगितले की, स्वप्नदिप रॅगिंगचा बळी ठरला आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boundary Joint Commission: 'पाकिस्तान-चीनमध्ये कसली सीमा?' भारताचा घणाघाती प्रहार, कथित बाउंड्री कमिशन फेटाळले; परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले कटू सत्य

Goa Drain Pollution: नाला प्रदूषित, गणेश विसर्जन बॅरलमध्ये! कष्टी कालेतील ग्रामस्थ संतप्त; प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Municipal Elections: 11 पालिका निवडणुकांना पुन्हा ब्रेक? OBC आयोगाने मागितली 2 महिन्यांची मुदतवाढ; 4 जानेवारीची डेडलाइन धोक्यात

Goa POP Ganesh Idols: 'पीओपी'च्या गणेशमूर्तींवर कारवाई; 5 विक्रेत्यांना दंड, पण मूर्ती जप्तीचा पत्ता नाही! सरकारच्या कारवाईवर सवाल

Udhampur Encounter: घरात लपून केला गोळीबार, पण जवानांनी घेतला बदला! उधमपूरमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार; सुरक्षा दलांचं 'ऑपरेशन ऑल आऊट'

SCROLL FOR NEXT