Kolkata Doctor Rape-Murder Dainik Gomantak
देश

Kolkata Doctor Rape-Murder: लेडी डॉक्टरवरील अत्याचारप्रकरणी निवासी डॉक्टरांचा उद्या देशव्यापी संप; वैद्यकीय अधीक्षकांवर कारवाईची मागणी

West Bengal Crime: कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील लेडी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाने आता जोर पकडला आहे.

Manish Jadhav

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील लेडी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाने आता जोर पकडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या संघटनेने ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन’ने 12 ऑगस्टपासून संपूर्ण देशात संपाची घोषणा केली आहे. सर्व सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टर संघटनांना त्यांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत ओपीडी, इलेक्टिव्ह सर्जरी आणि लॅबमधील काम बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आरडीएनेही डॉक्टरांना संपावर जाण्याची नोटीस दिली आहे.

दरम्यान, आरजी कर मेडिकल कॉलेजचे ज्युनियर डॉक्टरही पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करत आहेत. रुग्णालय बंद आहे. ज्युनियर डॉक्टरांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी केवळ एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर अनेक लोकांचा या घृणास्पद घटनेत सहभाग असू शकतो. आरोपी संजय रॉयच्या अटकेमागे काही मोठी गोष्ट लपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आतापर्यंत घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही पाहू दिलेले नाही. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत रुग्णालयातील काम बंद ठेवणार आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांना पदावरुन हटवले

दरम्यान, या घटनेनंतर आरोग्य विभागाने आरजी कर मेडिकल कॉलेजचे अधीक्षक डॉ. संजय वशिष्ठ यांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या जागी रुग्णालयाचे डीन बुलबुल मुखोपाध्याय यांना जबाबदारी देण्यात आली आहे. शुक्रवारी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यापासून अधीक्षकांना हटवण्याची मागणी होत होती. मात्र 48 तासांनंतर आरोग्य विभागाने त्यांना हटवण्याचे आदेश जारी केले.

आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडी

कोलकाता पोलिसांनी शनिवारी संजय रॉय या आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी आता 23 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत राहणार असून, तिथे त्याची चौकशी केली जाणार आहे. BNS च्या कलम 64 (बलात्कार) आणि 103 (हत्या) अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्लूटूथ इअरबडद्वारे पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले.

अटक आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

आरोपीच्या अटकेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्यास आपण त्यास पाठिंबा देऊ, असेही त्या म्हणाल्या. सीबीआय चौकशीस त्यांचा आक्षेप नाही. त्या पुढे म्हणाल्या की, "जर विद्यार्थ्यांचा पश्चिम बंगाल सरकारवर विश्वास नसेल, तर ते कोणत्याही तपास संस्थेशी संपर्क साधू शकतात. आमचा कोणताही आक्षेप नाही. हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."

राज्यपालांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले

दुसरीकडे, पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राज्य सरकारला याप्रकरणी तातडीने कारवाई करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हे प्रकरण भारत सरकारकडे मांडणार असल्याचेही त्यांनी म्हटले. शुक्रवारी उत्तर कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात महिला डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे संकेत मिळाले आहेत.

IMA चा अल्टिमेटम, देशव्यापी निदर्शनेचा इशारा

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरांवरील अत्याचाराविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करत कँडल मार्च काढला. यासोबतच इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) चौकशी पूर्ण करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. यासोबतच देशव्यापी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT