khushal singh adhikari dainik gomantak
देश

Uttarakhand Assembly Election Result: लोहाघाटमधून खुशाल सिंह अधिकारी विजयी

Uttarakhand Assembly Election Result live: उत्तराखंडचा पहिला विजयी उमेदवार खुशाल सिंह अधिकारी

दैनिक गोमन्तक

uttarakhand Assembly Election Result live: देशातील पाच राज्यांच्या निवडणूकांचे निकाल हाती येण्यास सुरूवात झाली असून उत्तराखंडमध्ये पहिला विजयी काँग्रेसचा झाला आहे. येथे लोहाघाट मतदार संघातून खुशाल सिंह अधिकारी यांनी बाजी मारत भाजपाच्या पूरन सिंह यांचा पराभव केला आहे. (khushal singh adhikari wins in lahoghat)

उत्तराखंडात (uttarakhand) ७० विधानसभा (Assembly Election) जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला (Counting of votes)सकाळी आठ वाजता सुरू झाली आहे. या राज्यात ६५ टक्के लोकांनी मतदान केलेली आहे. एक्झिट पोलनुसार भाजपा किंवा काँग्रेसला (Congress) बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली गेली असताना पहिलाच निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागला आहे.

खुशाल सिंह अधिकारी (khushal singh adhikari) यांना एकूण ११, ९०९ मते मिळाली आहे. तर भाजपाचे (BJP) उमेदवार पूरन सिंह यांना एकूण ८६५१ मते मिळाली आहेत. अधिकारी यांनी एकूण मतांपैकी ५३.४३ टक्के मते मिळाली आहेत, तर पूरन सिंह यांना ३८ टक्के मतेच मिळवता आली आहेत. तर आदमी पक्षाकडून (AAP) राजेश सिंह बिस्ट हे मैदानात उतरले होते. त्यांना फक्त ४१४ मते पडली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT