पत्नीच्या ब्वायफ्रेंडवर गोळीबार केला Dainik Gomantak
देश

पत्नीच्या अफेयर बद्दल कळताच बॉयफ्रेंड प्रायवेट पार्टवर झाडली गोळी

45 वर्षीय युवक गोळीबार करणार्‍या आरोपीच्या पत्नीसोबत मुंडनकावु येथे राहत होता.

दैनिक गोमन्तक

केरळमधील (Kerala) मुंडनकावुजवळ चेंगन्नूर (Chengannur) जिल्ह्यातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकराला (Boyfriend) गोळ्या (shot) घालून जखमी केले आहे. आरोपीने ही गोळी प्रियकर युवकाच्या खासगी भागावर मारल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार जखमी युवकाला तिरुवल्ला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल सोमवारी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत बातमी दिल्यानंतर चेंगन्नूर पोलिसांना घटनेची या माहिती मिळाली. (Kerala: Husband shot wife's secret lover at his private part)

45 वर्षीय युवक गोळीबार करणार्‍या आरोपीच्या पत्नीसोबत मुंडनकावु येथे राहत होता. गोळीबार करणारा आरोपी आणि त्याची पत्नी यांनी आधीच घटस्फोटासाठी परस्पर याचिका दाखल केली होती. परंतु शनिवारी आरोपी मुंडनकावू येथे पोहोचला आणि एअर पिस्तूलने प्रियकराच्या गुप्तांगावर गोळी झाडली. या घटनेनंतर प्रियकर तिरुवल्ला येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयाजवळ पोहोचला होता.

तो किरकोळ जखमी झाल्याने घरी परतला. पण अचानक त्याला त्याच्या खाजगी भागात तीव्र वेदना जाणवू लागल्या, ज्यामुळे काही तासांनी तो त्याच रुग्णालयात परत उपचारासाठी परत गेला. सदर घटनेची कोणतीही लेखी तक्रार मिळाली नसल्याने यासंदर्भात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT