KC Venugopal
KC Venugopal Dainik Gomantak
देश

केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक अन् सुरजेवालांची उडणार दांडी?

दैनिक गोमन्तक

काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर फेरबदल होणार आहेत. उदयपूरमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिरात घेण्यात आलेल्या निर्णयाबरोबरचं कोणत्याही व्यक्तीला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ कोणतेही पद भूषवता येणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे. अशा स्थितीत राहुल गांधी यांच्या सर्वात जवळचे मानले जाणारे केसी वेणुगोपाल यांना आपले पद सोडावे लागू शकते. कारण त्यांच्या काँग्रेस सरचिटणीसपदाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. 2017 मध्ये त्यांना सरचिटणीस बनवण्यात आले. वेणुगोपाल यांनी अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेस वॉर रुमच्या प्रभारीपदाची जबाबदारीही पार पाडली आहे. राहुल गांधींच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या वेणुगोपाल यांना 2020 मध्ये राजस्थानमधून राज्यसभेवर आणण्यात आले होते.

त्याचवेळी पक्षातील दुसरे मोठे नाव आहे, ते मुकुल वासनिक यांचे. तेही दीर्घकाळ काँग्रेस संघटनेत आहेत. वासनिक हे संघटनेचे नेते मानले जातात. ते एनएसयूआय आणि युवक काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष राहिले आहेत. 1984 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी लोकसभा निवडणूक जिंकून वासनिक हे सर्वात तरुण खासदार बनले. नव्या नियमानंतर त्यांना सरचिटणीसपदही सोडावे लागू शकते. वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक हे राहुल गांधींचे (Rahul Gandhi) निकटवर्तीय मानले जातात. एकेकाळी काँग्रेस अध्यक्षपदी वासनिक यांचे नाव पुढे आले होते.

दुसरीकडे, अशी आणखी काही नावे आहेत, ज्यांच्याबद्दल खात्रीने सांगता येत नाही. जर तुम्ही पदावर पाच वर्षे पूर्ण केलीत तर त्यांनाही हा नियम लागू होईल का? दुसरे नाव आहे, ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांचे, ज्यांना मीडियात काँग्रेस पक्षाचा प्रसिध्द चेहरा मानला जातो. त्यांना काँग्रेसचे सरचिटणीस होऊन फक्त 2 वर्षे झाली आहेत, परंतु 2014 मध्ये त्यांना मीडियात कॉंग्रेस प्रभारी होऊन 5 वर्षे झाली आहेत. अशा स्थितीत काँग्रेसला नवा मीडिया प्रभारी मिळणार का? हे काही प्रश्न आहेत, ज्यांची काँग्रेस कार्यकर्ते वाट पाहत आहेत.

याशिवाय, उदयपूर (Udaipur) चिंतन शिबिरानंतर अखिल भारतीय फिशरमॅन काँग्रेसचे अध्यक्ष टीएन प्रतापन यांनीही आपला राजीनामा पक्षप्रमुखांकडे पाठवला आहे. त्यांना 2017 मध्ये अध्यक्ष बनवण्यात आले आहे. अशा स्थितीत काँग्रेसच्या सरचिटणीस आणि प्रभारींवर पाच वर्षांनंतर पद सोडण्याचा दबाव वाढणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रादो 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT