Destination Wedding: डेस्टिनेशन वेडिंगसाठी जयपूर, गोवा आणि उदयपूरला मागे टाकत काशी लोकांची पहिली पसंती ठरत आहे. पर्यटनासोबतच देशाची सांस्कृतिक राजधानी असलेली काशी डेस्टिनेशन वेडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आली आहे.
लग्नसराई सुरू झाल्यानंतर बनारसमधील सर्व हॉटेल्स, लॉज आणि रिसॉर्ट्स बुक करण्यात आले आहेत. हिवाळी हंगामासाठी सर्वाधिक बुकिंग झाले आहे.
इव्हेंट कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार 13 डिसेंबरपर्यंत 50 लग्नांचे बुकिंग झाले आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी छावणीपासून घाट किनारी हॉटेलपर्यंत बुकिंग करण्यात आली आहे. शाही विवाहासाठीही लोक काशीला पसंती देत आहेत.
नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये डेस्टिनेशन वेडिंगसाठी दिल्ली आणि मुंबईहून 15 चार्टर्ड विमाने बुक करण्यात आली आहेत. सहा ते सात लग्ने असून त्यात कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत.
वास्तविक, काशी घाट, काशी विश्वनाथ धाम, सुबह-ए-बनारस जगभर प्रसिद्ध आहेत. याच गोष्टी लोकांना आकर्षित करत आहे. काशीमध्ये सात फेरे घेऊन लोकांना त्यांचे लग्न संस्मरणीय बनवायचे आहे, म्हणून ते डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य देत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.