Karnataka's  new chief minister will be sworn tomorrow after B. S. Yediyurappa resigns
Karnataka's new chief minister will be sworn tomorrow after B. S. Yediyurappa resigns Dainik Gomantak
देश

Karnataka: नव्या मुखमंत्र्यांचा उद्या शपथविधी

Abhijeet Pote

कर्नाटकचे(Karnataka) मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा(B. S. Yediyurappa) यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत अशातच आता दिल्लीत(Delhi) पक्षश्रेष्ठींच्या झालेल्या बैठकीत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या(Karnataka New Chief Minister) निवड झाली असून उद्या बुधवारी सायंकाळपर्यंत ते शपथ घेणार आहेत अशी माहिती मिळत आहार तर नवे मुख्यमंत्री नेमके कोण आहेत आज सायंकाळपर्यंत समजणार आहे.(Karnataka's new chief minister will be sworn tomorrow)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी काल आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, कर्नाटकात नवीन मुख्यमंत्री कोण होणार आणि दिल्ली हायकमांड नेमकी कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री यांनी लिंगायत समाजाचा मुख्यमंत्री नको असे सांगितले होते, पक्षाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष हे देखील लिंगायत समाजाचे आहेत आणि त्यांचे नाव ही मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होते मात्र बी. एस. येडियुरप्पा यांनी केलेल्या या विधानामुळे भाजपाकडून आता नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात होता मात्र आता नाव निश्चित झाल्याचे समोर येत आहे.

उद्या मुख्यामंत्र्यांच्या शपथ विधीनंतर लगेचच एका आठवड्यात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून हे नवे चेहरे नेमके कोण असतील हे पाहणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे. बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर राज्यासह दिल्लीतही वेगवान घडामोडी पाहायला मिळाल्या. कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून एकूण मुख्य तीन नावांची चर्चा होत असली तरी या तिन्ही नावात आघाडीवर प्रल्हाद जोशींच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे ते सध्या केंद्रातील मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. भाजप त्यांना राज्यात पाठवेल असे बोलले जात आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या या शर्यतीत प्रल्हाद जोशी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे.त्यानंतर बीएल संतोष यांच्या नावाचीही मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा आहे जे अनेक वर्षांपासून संघटन मंत्री तसेच ते सध्या भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. तसेच उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचंही चर्चेत असल्याचे समजत आहे. या तीन नावांसोबतच भाजप नेते मुर्गेश निराणी आणि बसवराज एतनाळ यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

Cancer News : फुफ्फुसाच्या कर्करोगाची गोमेकॉत साधनसुविधा

IRCTC Goa Tour Package: आयआरसीटीसीचं ‘गोवा टूर पॅकेज’! मिळेल सर्व काही बजेटमध्ये; जाणून घ्या डिटेल्स

SCROLL FOR NEXT