Karnataka will increase the age limit for buying and selling tobacco, cigarettes Dainik Gomantak
देश

तंबाखू, सिगारेट खरेदी-विक्रीसाठी वयोमर्यादा वाढणार, हुक्का पार्लरलाही टाळे लावण्याचा सरकारचा विचार

Ashutosh Masgaunde

Karnataka will increase the age limit for buying and selling tobacco, cigarettes:

कर्नाटक सरकारने तरुणांना तंबाखूपासून लांब ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या खरेदीसाठी नियम अधिक कडक करण्याची तयारी सुरू आहे.

अलिकेडे अनेक तरुण याला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. 14-15 वर्षे वयोगटातील मुलेही जास्त प्रमाणात सिगारेट ओढताना दिसतात. विडीचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा परिस्थितीत या मुलांना तंबाखूपासून दूर ठेवण्यासाठी शासनाने नियम कडक करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

ज्या अंतर्गत सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्याचे वय वाढवले ​​जाऊ शकते. कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सध्या तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करण्याचे वय १८ वर्षे आहे. कर्नाटक सरकार ते वाढवून 21 वर्षे करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्यात सुधारणा केल्या जात आहेत.

ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी तंबाखू आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांची विक्री बंद करावी असा मुद्दाही उपस्थित झाला होता.

शाळांव्यतिरिक्त आता ही उत्पादने रुग्णालये आणि मंदिरांजवळही विकली जाणार नाहीत. हे पदार्थ विकण्यासाठीही वयाची २१ वर्षे आवश्यक असेल.

सध्या राज्यात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या खरेदी आणि सेवनाचे वय 18 वर्षे आहे.

कर्नाटकात हुक्का बार्सना परवानग्या न देण्याबाबत विचार सुरू असल्याचे राव यांचे म्हणणे आहे. क्रीडामंत्री नागेंद्र यांनीही या संदर्भात विधानसभेत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली आहे.

हुक्का बारमुळे तरुणांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. हुक्का बारकडे तरुणांचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे आता कायद्यात सुधारणा करण्याची तयारी सुरू झाली आहे. कायदेशीर बाबी समजून घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. असे राव म्हणाले

आज अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेमुळे तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होत असल्याचे आरोग्यमंत्री राव यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे हा आजार मुळापासून नष्ट का करू नये? म्हणून असा निर्णय सरकारने घेतला आहे.

सर्वप्रथम तरुणाई तंबाखूच्या माध्यमातून व्यसनाला सुरुवात करतात. त्यानंतर तरुणाई दारू इत्यादी इतर अमली पदार्थांकडे वळते. मात्र आता याला सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT