Karnataka Crime Dainik Gomantak
देश

Karnataka Crime: पती -पत्नीसह मुलाचा मृतदेह रिसॉर्टमध्ये; खून की आत्महत्या? पोलिसांच्या हाती व्हिडिओ फुटेज

Karnataka Crime: कोडागु जिल्ह्यातील एका खासगी रिसॉर्टमध्ये तीन मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

Manish Jadhav

Karnataka Crime: कर्नाटकातून आत्महत्येची मोठी बातमी समोर आली आहे. कोडागु जिल्ह्यातील एका खासगी रिसॉर्टमध्ये तीन मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. पोलिस रिसॉर्टच्या आत आणि बाहेरही तपास करत आहेत.

कर्नाटक पोलिसांचे म्हणणे आहे की, कोडागु जिल्ह्यातील माडीकेरीजवळ एक खाजगी रिसॉर्ट आहे. केरळमधील कोल्लम इथे राहणारा एक व्यक्ती आपली पत्नी आणि 3 वर्षाच्या मुलासह या रिसॉर्टमध्ये थांबला होता. पोलिसांनी रविवारी सकाळी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. पती-पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याचे प्राथमिक पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र, कुटुंबाने एवढे कठोर पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. पोलिसांनीही या घटनेची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना दिली आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच ही हत्या की आत्महत्या हे स्पष्ट होईल. पोलीस रिसॉर्टची चौकशी करत आहेत आणि रात्रीच्या वेळी रिसॉर्टमधून ओरडण्याचा किंवा भांडणाचा आवाज आला का हे पाहण्यासाठी आसपासच्या लोकांची चौकशी करत आहेत.

व्हिडिओ फुटेज समोर आले

एका खासगी रिसॉर्टचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास करताना दिसत आहे. तपासासाठी रिसॉर्टच्या आतील आणि आजूबाजूच्या परिसर सील करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: घोगळ येथे महिलेचे सुवर्णालंकार लांबविले

पर्रीकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल, तर विकास अडवू नका, त्याला गती द्या! डबल ट्रॅकिंग आणि कोळसा वाद

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Goa Cancer Hospital: 'कॅन्‍सर इस्‍पितळ' वर्षभरात कार्यान्‍वित होणार! मंत्री राणेंनी दिली हमी; सामंजस्‍य कराराची प्रक्रियाही सुरू

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

SCROLL FOR NEXT