Karnataka Politics Twitter
देश

Karnataka Politics: मुरुगा मठाचे महंतावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप,कर्नाटकात राजकारण तापले

Shivamurthy Murugha Sharanaru: कर्नाटकातील श्री मुरुगा मठाच्या महंतावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमन्तक

अल्पवयीन मुलींच्या कथित लैंगिक छळाच्या संदर्भात श्री मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांच्यावर आरोप झाल्यानंतर कर्नाटकातील राजकारण चांगलेच तापले आहे. श्री मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांच्या विरोधात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुख्य पुजारी शिवमूर्ती मुरुगा शरनारू (Shivamurthy Murugha Sharanaru) सध्या मठातच उपस्थित आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजप नेते एच विश्वनाथ यांनी कर्नाटक (Karnataka) सरकारवर महंतांविरुद्ध संयम बाळगल्याबद्दल हल्लाबोल केला.

भाजप नेत्याने केला मोठा आरोप

कर्नाटक भाजपचे (BJP) आमदार एच विश्वनाथ यांनी श्री मुरुघा मठाच्या शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल सांगितले की जर एचएम अराग ज्ञानेंद्र यांना काही लाज वाटत असेल तर त्यांनी द्रष्ट्याविरुद्ध कारवाई करावी आणि चित्रदुर्गाच्या एसपीने कारवाई सुरू करू नये, त्यांना त्वरित निलंबित करावे.

भाजप नेत्यांनी घेतली राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट

कर्नाटक भाजप नेते एच विश्वनाथ यांनी बुधवारी कर्नाटकचे गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र यांचीही भेट घेतली. बैठकीनंतर भाजप नेत्याने म्हटले की, गृहमंत्री ज्ञानेंद्र यांना लाज असेल तर त्यांनी आरोपी पुजाऱ्यावर कारवाई करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT