Karnataka Chief Minister Basavaraj Bommai  Dainik Gomantak
देश

कर्नाटकात आयारामांना 'अच्छे दिन'

बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यापूर्वी जल संपदा मंत्री होते त्यानंतर त्यांनी गृहमंत्री पद भूषवले.

दैनिक गोमन्तक

मागील काही दिवसांपासून कर्नाटकातील राजकिय घडामोडीला अखेर नव्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने ब्रेक लागला. कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी बाजूला सारुन शपथ घेतली आहे. केंद्रीय निरिक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी केली. मुख्यमंत्री बोम्मई कर्नाटकातील बहुसंख्य लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांचे निकटवर्तीय मानले जातात. येडीयुरप्पा यांनी बसवराज बोम्मई यांचे नाव मुख्यमत्री पदासाठी पक्षश्रेष्ठींना सुचवल होतं असं सांगण्यात येत आहे. बसवराज बोम्मई यापूर्वी जल संपदा मंत्री होते त्यानंतर त्यांनी गृहमंत्री पद भूषवले.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे सुपुत्र आहेत. अर्थात आधी वडील आणि नंतर मुलगाही मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारी ही दुसऱी घटना आहे. त्यांच्या आधी जेष्ठ नेते एच. दी. देवेगौडा आणि डी. कुमारस्वामी या दोघा पिता पुत्रांनीकर्नाटकचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. भाजपमध्ये अतिशय वेगाने वर गेलेल्या नेत्यांपैकी एक बसवराज बोम्मई आहेत. बोम्मई यांची राजकिय कारकिर्दीची सुरुवात ही जनता दलातून झाली झाली होती. त्यानंतर त्यांनी ते 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक विषयावर सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये ते प्रामुख्याने कारवारमध्ये निर्माण झालेल्या पूर स्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर संपूर्ण राज्यातील पूरस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बसवराज बोम्मई यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. तसेच आपण तात्काळ दिल्लीला जाणार आहे.

पूरग्रस्त परिस्थितीच्या पाश्वभूमीवर मोदी सरकारने राज्यासाठी 620 कोटी रुपये अनुदान जाहीर केले आहे. माझ्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरीही सर्वांना विश्वासात घेऊनच येणाऱ्या काळात सार्जनिक कामे संघप्रवृत्तीच्या पध्दतीने करणार आहे. दिल्लीतील भेटीनंतर जेष्ठांची चर्चा करुन मंत्रिमंडळाचा रचनेचा निर्णय घेतला जाईल अशी महत्त्वाची माहितीही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT