Karnataka Police Arrested A Model From Mumbai In a Honey Trap Case. Dainik Gomantak
देश

'हनीट्रॅप', सेक्ससाठी घरी बोलवून इस्लाम स्विकारण्याची धमकी, मुंबईच्या मॉडेलला बेंगळुरूत अटक

Ashutosh Masgaunde

Karnataka Police Arrested A Model From Mumbai In a Honey Trap Case

कर्नाटक पोलिसांनी हनी ट्रॅप प्रकरणात मुंबईतून एका मॉडेलला (Model) अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या टोळीने पीडित व्यक्तीला इस्लाम धर्म स्वीकारण्याची आणि खतना करण्याची धमकी देऊन मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. ही घटना बेंगळुरूमधील पुट्टेनहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

नेहा उर्फ मेहर असे अटक केलेल्या मॉडेलचे नाव असून प्राथमिक तपासात ती या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले की नेहा उर्फ मेहर टेलिग्रामद्वारे (Telegram) बेंगळुरूमधील (Bengaluru) 20 ते 50 वयोगटातील व्यक्तींच्या संपर्कात होती.

तिने त्यांना जेपी नगरच्या राहत्या घरी शारीरिक संबंध ठेवण्याचे आमिष दाखवले. तिच्या घरात प्रवेश करताच ती त्यांना बिकिनी घालून आत बोलवायची. आणि त्यानंतर पीडित व्यक्तीचा आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित केला जायचा.

पीडित व्यक्ती महिलेच्या घरी गेल्यानंतर महिलेचे साथीदार त्यांचे खासगी संबंध चित्रित करायचे त्यानंतर पीडित व्यक्तीचा मोबाई हिसकावून घेत त्याचे कॉन्टॅक्ट शेअर करायचे.

जर पीडित व्यक्ती पैसे देत नसतील तर ते त्यांचे खाजगी व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या सर्व कॉन्टॅक्ट्सना पाठवण्याची धमकी द्यायचे.

इस्लाम धर्म स्वीकार नाहीतर...

व्हिडिओ चित्रित केल्यानंतर आरोपी पीडित व्यक्तीला मॉडेलशी लग्न करण्याची मागणी करायचे. ती मुस्लिम असल्यामुळे तिच्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा असा त्यांचा आग्रह असायचा.

पीडितांची ताबडतोब सुंता करून घ्यावी, यासाठीही आरोपी मागे लागायचे. या मागण्यांमुळे पीडित घाबरून आरोपींना मोठ मोठी रक्कम द्यायचे.

पीडित व्यक्तीच्या धाडसामुळे भांडाफोड

पीडितांपैकी एकाने हिंमत दाखवून पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर टोळीची भांडाफोड झाला. या टोळीने 12 जणांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या टोळीचा आणखी गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तपास सुरू आहे.

याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी शरणा प्रकाश बालिगेरा, अब्दुल खादर आणि यासीन यांना अटक केली होती. पोलिसांनी आणखी एका आरोपी नदीमचा शोध सुरू केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT