Holy Quran  Dainik Gomantak
देश

Holy Quran: पत्नी, मुलांची काळजी घेणे हे पतीचे कर्तव्य; पवित्र कुराणचा दाखला देत कोर्टाने फेटाळली याचिका

Holy Quran: "विवाहाच्या अपयशामुळे एखादा जोडीदार निराधार होऊ नये असे अंतरिम/कायमस्वरूपी पोटगी देण्याचे उद्दिष्ट आहे."

Ashutosh Masgaunde

Karnataka High Court said Holy Quran Calls Upon the Husband to Look after his Wife and Children:

कर्नाटक हाय कोर्टाने एका घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणी करताना मुस्लिमांचा धर्मग्रथं असलेल्या पवित्र कुराणचा दाखला दिला. यावेळी कोर्ट म्हणाले, पवित्र कुराण पतीने पत्नी आणि मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करते.

न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित यांनी सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर हा आदेश दिला की, पतीने केलेल्या दाव्यांना सिद्ध करण्यासाठी कोणतेही सबळ पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्याची विभक्त पत्नी नोकरी करत होती की नाही, तिचे उत्पन्नाचे काही स्त्रोत आहेत की नाही हे सिद्ध होत नाही.

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत, पत्नी आणि मुलांना सांभाळण्याचे मुख्य कर्तव्य पतीच्या खांद्यावर असते असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

"पवित्र कुराण आणि हदीस म्हणते की पत्नी आणि मुलांची काळजी घेणे हे पतीचे कर्तव्य आहे, विशेषत: ते अपंग असताना पतीचे जबाबदार आणखी वाढते," असे कोर्ट पुढे म्हटले.

यावेळी पोटगीची दरमहा 25,000 हजार रुपये रक्कम खूप जास्त असल्याचा पतीचा युक्तिवाद कोर्टाने नाकारला.

न्यायमूर्ती दीक्षित यांनी असे निरीक्षण नोंदवले की आजच्या युगात आणि मूलभूत गरजांची किंमत रक्ताच्या किमतीपेक्षा जास्त असताना असा दावा स्वीकारार्ह नाही.

"रक्तापेक्षा ब्रेड महाग असताना ही रक्कम खूप जास्त आहे हे याचिकाकर्त्याच्या विद्वान वकिलांचा युक्तिवाद आम्ही स्वीकारु शकत नाही. या महागड्या दिवसांमध्ये तुमचा युक्तीवाद आम्ही मान्य करणार नाही," असे न्यायालयाने म्हटले.

अंतरिम किंवा कायमस्वरूपी पोटगी देण्याचा हेतू हा आहे की जो जोडीदार अवलंबून आहे तो विवाह तुटल्यामुळे निराधार किंवा बेघर होऊ नये.

"विवाहाच्या अपयशामुळे एखादा जोडीदार निराधार होऊ नये असे अंतरिम/कायमस्वरूपी पोटगी देण्याचे उद्दिष्ट आहे. पोटगीच्या रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी कोणतेही स्ट्रेटजॅकेट सूत्र नाही,” असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

बेंगळुरू येथील कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध राज्यघटनेच्या कलम 227 अंतर्गत हाय कोर्टाच्या हस्तक्षेपासाठी कोणतेही कलम नाही हे लक्षात घेऊन न्यायालयाने पतीने दाखल केलेली याचिका फेटाळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT