Karnataka High Court  Dainik Gomantak
देश

Karnataka High Court: जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या आरोपीला हायकोर्टाकडून पॅरोल मंजूर; पत्नीने याचिकेत केली ‘ही’ मागणी

Husband-Wife Relations: अलीकडेच कर्नाटक उच्च न्यायालयाने एका खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या दोषीला पॅरोल मंजूर करण्याचा निर्णय घेतला.

Manish Jadhav

Husband-Wife Relations: अलीकडेच कर्नाटक उच्च न्यायालयाने एका खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या दोषीला पॅरोल मंजूर करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, अपत्य हवे असलेल्या आरोपीच्या पत्नीच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने हा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती एसआर कृष्णा यांनी याचिकेवर सुनावणी केली. 2019 मध्ये ट्रायल कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, पत्नीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये तिने मुलाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आरोपीला न्यायालयाने 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला. बार आणि बेंचच्या रिपोर्टनुसार, न्यायालयाने म्हटले की, 'दोषीच्या पत्नीला केवळ या कारणासाठी पॅरोल हवा आहे की त्या दोघांचे लग्न 11.3.2023 रोजी (पहिल्या पॅरोल दरम्यान) झाले होते आणि ती मुलाच्या हक्कांपासून वंचित आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'अशा परिस्थितीत आरोपी पतीला 30 दिवसांच्या कालावधीसाठी सामान्य पॅरोल मंजूर करणे आम्हाला योग्य वाटते.' न्यायमूर्ती कुमार यांनी कोलारच्या आनंदला 5 जून ते 4 जुलै 2024 पर्यंत पॅरोल मंजूर केला आहे. ट्रायल कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, पण 2023 मध्ये उच्च न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा कमी केली. न्यायालयाकडून पॅरोल मिळाल्यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याने लग्न केले होते.

याचिकेत काय म्हटले आहे?

याचिकेत दोषी आरोपीच्या पत्नीने म्हटले की, तिचा पती तुरुंगात असल्याने ती मुलाच्या हक्कांपासून वंचित आहे. तिने कोर्टात सांगितले की, ती तिच्या सासूसोबत एकटीच राहते. सासू आजारी असते. त्यांना नातवंड हवा आहे. त्यावर विचार करुन न्यायालयाने आरोपीला पॅरोल मंजूर केला. मात्र, आठवड्यातून एकदा पोलिसांसमोर हजर राहण्याची अटही घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT