Karnataka High Court Dainik Gomantak
देश

Karnataka High Court: नवऱ्यावर बलात्काराचा आरोप, कर्नाटक HC म्हणाले, 'कायद्याच्या दुरुपयोगाचे यापेक्षा चांगले उदाहरण...'

Karnataka High Court: एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला.

Manish Jadhav

Karnataka High Court: एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला. लग्नानंतर पतीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता.

ही महिला त्याच्यासोबत फक्त एक दिवस राहिली. पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्धच्या फौजदारी प्रक्रियेवर रोख लावत उच्च न्यायालयाने म्हटले की, 'हे प्रकरण पाहता, कायद्याच्या दुरुपयोगाचे यापेक्षा चांगले उदाहरण असू शकत नाही.'

दरम्यान, महिलेने (Women) दाखल केलेल्या तक्रारीला आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्याला पती आणि त्याच्या नातेवाईकांनी कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले.

दोघेही बंगळुरुमधील एमएनसी मोटरसायकल शोरुममध्ये एकत्र काम करायचे. 27 जानेवारी 2023 रोजी एका मंदिरात त्यांचे लग्न झाले. याआधी ते चार वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यांनी मल्लेश्वरम येथील विवाह निबंधकासमोर लग्नाची नोंदणी करुन घेतली. त्याच दिवशी पत्नीचा वाढदिवसही होता.

दुसरीकडे, पतीला महिलेचे पूर्वीचे प्रेमसंबंध आणि ती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीशी संपर्कात असल्याची माहिती मिळाली. यावरुन त्यांच्यात दुसऱ्या दिवशी वाद झाला. या वादानंतर पत्नी सासरचे घर सोडून 29 जानेवारी रोजी माहेरी गेली होती.

यादरम्यान न्यायालयाने सांगितले की, असे मानले जाते की, महिलेने आधी पतीला लग्न मोडण्याची धमकी दिली. जवळपास 32 दिवस दोघांमध्ये चर्चा झाली नाही. त्यानंतर फिर्यादीने पोलिसांत तक्रार देऊन हे आरोप केले.

महिलेचा युक्तिवाद, लग्नाच्या दिवशी काय झाले हे तिला माहीत नाही?

लग्नाच्या (Marriage) दिवशी तिच्यासोबत काय झाले हे माहित नसल्याचे पत्नीने पोलिस तक्रारीत म्हटले आहे. ती दारुच्या नशेत होती. विवाह निबंधकासमोर तिला कोणत्या कागदपत्रावर सही केल्याचे आठवत नाही.

तिचे पूर्वीचे प्रेमसंबंध पतीला कळताच तिच्यावर अत्याचार करण्यात आला. जरी ती विवाहित होती. त्यामुळे लग्नानंतर दोघांमधील कथित शारीरिक संबंध हा बलात्कार ठरतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT