Karnataka Election Result 2023: Dainik Gomantak
देश

Karnataka Election Result 2023: 'हे' ठरले काँग्रेसच्या कर्नाटक विजयाचे शिल्पकार; पडद्यामागे राहून हलवली सुत्रे...

रणनीती, प्रचार, जाहीरानामा ठरवण्यात पार पाडली महत्वाची भूमिका

Akshay Nirmale

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे भाजपच्या दक्षिण विजयाचे द्वार आता काँग्रेसच्या हातात गेले आहे.

काँग्रेसच्या या विजयात प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा महत्वाचा वाटा आहेच. पण काँग्रेसच्या या विजयासाठी पडद्यामागूनही काही नेते कार्यरत होते.

त्यांच्या चाणक्यनीतीमुळेच काँग्रेसला हा मोठा विजय मिळाल्याचे मानले जात आहे. जाणून घेऊनया काँग्रेसच्या या विजयाच्याा खऱ्या शिल्पकारांबद्दल...

M. B. Patil

एम. बी. पाटील

कर्नाटकातील काँग्रेस नेते एम. बी. पाटील हे राज्यातील काँग्रेसचा लिंगायत चेहरा मानले जातात. काँग्रेसची निवडणूक रणनीती ठरविण्यात एम. बी. पाटील यांची भूमिका महत्वाची होती. काँग्रेसच्या प्रचार समितीचे ते प्रमुख आहेत.

काँग्रेसने यावेळच्या प्रचारात स्थानिक मुद्यांवरच तसेच डुअर टु डुअर प्रचारावर भर दिला. या मागे पाटील यांचाच ब्रेन होता, असे म्हणतात. एम. बी. पाटील हे पाचवेळा आमदार राहिले आहेत तर कुमारस्वामी सरकारमध्ये ते गृहमंत्रीही होते.

याशिवाय भाजपचे बडे नेते जगदीश शेट्टर यांना काँग्रेसमध्ये आणण्याची मोठी कामगिरी एम. बी. पाटील यांच्यावरच सोपवली गेली होती, ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. एम. बी. पाटील हे सिद्धरामय्या यांच्या जवळचे मानले जातात. त्यांचे वडील बी. एम. पाटील देखील मोठे नेते होते.

शशिकांत सेंथिल

शशिकांत सेंथिल काँग्रेसमध्ये येण्याआधी आयएएस अधिकारी होते. 2019 मध्ये, त्यांनी IAS नोकरीचा राजीनामा दिला आणि 2020 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जुलै 2022 मध्ये त्यांना काँग्रेसच्या वॉररूमची जबाबदारी देण्यात आली.

वॉररूममधून निवडणुकीदरम्यान प्रत्येक मतदारसंघाचे सखोल विश्लेषण करून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना अहवाल पाठवण्यात आला. फॅक्ट फायडिंगसह भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा प्रतिकार करण्यासाठी सेंथिल यांच्या नेतृत्वाखालील एख टीम वॉररूममध्ये कार्यरत होती.

सेंथिल हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. भाजप कर्नाटकात हिंदुत्वाच्या नावावर फूट पाडण्याचे राजकारण करत आहे, त्यामुळेच नोकरीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले होते.

Shashikant Senthil
Sunil Kanugolu

सुनील कानुगोलू

सुनील कानुगोलू हे डेटा अॅनालिसिसमधील तज्ज्ञ मानले जातात. कानुगोलू हे 2022 पासून कर्नाटक काँग्रेसची रणनीती ठरविण्यात सहभागी आहेत. कानुगोलू यांनी प्रचार, सर्वेक्षण आणि उमेदवारांची निवड यासाठी रणनीती तयार केली.

कर्नाटकातील बेल्लारी येथील रहिवासी असलेल्या कानुगोलू यांनी अमेरिकेतून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. 2009 मध्ये ते भारतात परतले. त्यांनी प्रशांत किशोर यांच्या टीममध्ये (सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स) सामील झाले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते नरेंद्र मोदींच्या प्रचार करणाऱ्या टीममध्ये होते. 2017 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपची रणनीती बनवण्यातही कानुगोलू यांचा मोठा वाटा होता. त्यांनी 2022 मध्ये अकाली दलासाठीही काम केले.

कर्नाटकसाठी प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा निष्फळ ठरल्याने काँग्रेसने कानुगोलू यांच्याशी संपर्क साधला. भाजप सरकारविरोधातील राज्यात 40 टक्के सरकार, पे-सीएम आणि रेट कार्डसारख्या मोहिमेमागे कानुगोलू यांचा ब्रेन होता.

काँग्रेसचा जाहीरनामा करण्यातही त्यांनी सहकार्य केले होते. काँग्रेसने त्यांना मध्य प्रदेशची जबाबदारीही दिली आहे. यासोबतच ते लोकसभा निवडणुकीची रणनीती आखणाऱ्या काँग्रेसच्या 2024 टास्क फोर्सचेही सदस्य आहेत.

जी. परमेश्वर

कर्नाटकमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी जी. परमेश्वर यांच्यावर होती. या जाहीरनाम्यातील पाच मुद्यांवर मोठी चर्चा झाली. जाहीरनाम्यातील पीएफआयसह बजरंग दलावरील बंदीच्या उल्लेखाने काँग्रेसची काहीशी अडचण झाली. मात्र उर्वरित 62 पानांचा जाहीरनामा काँग्रेसच्या बाजूने गेला.

गृहज्योती योजनेंतर्गत दरमहा 200 युनिट मोफत वीज, गृहलक्ष्मी योजनेंतर्गत घरातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपयांची हमी, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अण्णा भाग्य यांच्यामार्फत दरमहा 10 किलो तांदूळ, बेरोजगार पदवीधरांना मासिक 3 हजार रुपये, डिप्लोमा धारकांना दोन वर्षांसाठी दरमहा 1500 रुपये या घोषणा उपयोगी ठरल्या.

1989 मध्ये परमेश्वर हे आमदार झाले होते. पण ते लो प्रोफाईल नेते आहेत. ते प्रसिद्धीपासून दूरच राहतात. 2018 मध्ये काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचे सरकार बनले तेव्हा परमेश्वर उपमुख्यमंत्री होते. सिद्धरामय्या सरकारमध्ये 1999 मध्ये ते उच्च शिक्षण मंत्री आणि 2015 मध्ये गृहमंत्री होते.

G. Parameshwara

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT