कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुधींद्र राव यांनी मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे.  Dainik Gomantak
देश

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर पुन्हा भ्रष्टाचाराचे आरोप

सीबीआय, ईडीसह किंवा अन्य मध्यमातून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी 16 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे.

दैनिक गोमन्तक

बंगळूर: कर्नाटक (Karnataka) राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुधींद्र राव यांनी मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा (Chief Minister B. S. Yeddyurappa) यांच्यावर भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप केले आहे. तर काँग्रेसने (Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. सीबीआय, ईडीसह किंवा अन्य मध्यमातून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी 16 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला आहे.

30 डिसेंबर 2019 मध्ये सुधींद्र राव यांची केएसपीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती यामुळेच करण्यात आली होती, 16 कोटींची रक्कम ते आपल्या काळात चुकती करतील. याबाबत सुधींद्र राव म्हणाले, ही रक्कम उभी करण्यासाठी मला माझी संपत्तीही देखील विकावी लागली आहे. यावर काँग्रेसचे नेते गुंडूराव यांनी याची सीबीआय, ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

व्हिडिओमधून समोर आलेल्या माहितीमध्ये सुधींद्र राव यांनी सांगितल्यानुसार, रोख 9.75 कोटी रुपये मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे नातेवाईक मरईस्वामी यांना वेगवेगळ्या तारखांना देण्यात आली आहे. ही रक्कम जानेवारी ते फेब्रुवारी 2020 देण्यात आली हेती. मरईस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचा मुलगा विजयेंद्र आणि नातू शशिधर मार्डी, नातेवाईक संजय श्री यांच्याशी सुधींद्र राव यांची भेट घेतली. या भेटीत राव यांच्यासमोर नवीन अटी ठेवण्यात आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT