Karnataka CM Basavaraj Bommai Dainik Gomantak
देश

Karnataka: 'आम्ही सरकार चालवत नाही...', बोम्मई सरकारमधील मंत्र्याची ऑडिओ क्लिप लिक

Karnataka Politics: कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Karnataka CM Basavaraj Bommai: कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मंत्रिमहोदयांच्या या वक्तव्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मईही अडचणीत आले आहेत. बोम्मई यांनी मंत्रिमहोदयांचे वक्तव्य सत्य असल्याचे म्हटले आहे. परंतु या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, कर्नाटकचे कायदा मंत्री जेसी मधुस्वामी एका ऑडिओ क्लिपमध्ये आम्ही सरकार चालवत नाही, आम्ही फक्त ते सांभाळत आहोत, असे म्हणताना ऐकू येत आहेत.

वक्तव्याचा अर्थ काय आहे

62 वर्षीय बोम्मई यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आल्याची चर्चा असताना ही क्लिप व्हायरल झाली आहे. पुढील वर्षी कर्नाटकमध्ये (Karnataka) विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, बोम्मई यांच्या कार्यपध्दतीवर भाजप नेतृत्व नाखूश नसल्याच्या बातम्या येत आहेत. अशा स्थितीत निवडणुकीच्या निकालावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून निवडणुकीपूर्वी नव्या चेहऱ्याला संधी देण्याची तयारी सुरु झाली आहे.

तथापि, दोन दिवसांपूर्वी भाजपच्या (BJP) एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले होते की, 'बोम्मई मुख्यमंत्री पदावर असतानाच पक्ष पुन्हा एकदा राज्यात सरकार स्थापन करेल.' बीएस येडियुरप्पा (BS Yeddyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बोम्मई यांनी 2021 मध्ये मुख्यमंत्री शपथ घेतली.

मुख्यमंत्र्यांनी कायदामंत्र्यांचा बचाव केला

त्याचवेळी, येडियुरप्पा यांनीही मुख्यमंत्र्यांची खुर्ची पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह अचानक कर्नाटक दौऱ्यावर आले होते. यानंतर बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदावरुन उचलबांगडी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. यातच कायदामंत्र्यांची ऑडिओ क्लिप लीक झाल्यानंतर आज खुद्द मुख्यमंत्र्यांनी सर्व काही ठीक असून कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले.

यातच आता, बोम्मई सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने कायदामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचवेळी या प्रकरणी जनतेशी बोलून प्रकरण सोडवू, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे. कायदामंत्र्यांच्या वक्तव्यावर बोम्मई म्हणाले की, 'त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.' बँकांनी केलेल्या व्याजाच्या मागणीबाबत त्यांनी ही टिप्पणी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT