RSS Dainik Gomantak
देश

Karnataka Politics: 'RSS-बजरंग दलावर बंदी घातल्यास काँग्रेसची राख होईल...,' भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

Karnataka BJP Chief Challenge: दरम्यान, कर्नाटक भाजपचे प्रमुख नलिन कतील यांनी प्रियांक खर्गे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.

Manish Jadhav

Karnataka Politics: कर्नाटकमध्ये बजरंग दल आणि आरएसएसवरील बंदीच्या संदर्भात मंत्री आणि काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्याने राजकारण तापले आहे.

दरम्यान, कर्नाटक भाजपचे प्रमुख नलिन कतील यांनी प्रियांक खर्गे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. कतील यांनी प्रियांक खर्गे यांना आव्हान देत हिंमत असेल तर आरएसएस आणि बजरंग दलावर बंदी घालून दाखवा असे म्हटले आहे.

काँग्रेसने बजरंग दल आणि आरएसएसवर बंदी घातल्यास राख होईल, असेही यावेळी कतील म्हणाले. प्रियांक खर्गे यांनी देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे. प्रियांक खर्गे यांनी असे वक्तव्य करण्यापूर्वी विचार करायला हवा होता, असे कतील म्हणाले.

प्रियांक खर्गे यांच्यावर बंदी आणण्याचे आव्हान

कर्नाटक भाजपचे अध्यक्ष नलिन कतील म्हणाले की, प्रियांक खर्गे राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेवर बंदी घालण्याबाबत बोलले. पंतप्रधान आरएसएसमधून येतात. ते एक स्वयंसेवक आहेत, जे आज केंद्रीय पदावर आहेत.

आम्ही सर्वजण आरएसएसचे (RSS) आहोत. याआधी जवाहरलाल नेहरु, इंदिरा, नरसिंह राव यांच्या सरकारांनीही राष्ट्रीय स्वयंसेवकांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना यश आले नाही.'

असे कर्नाटक भाजपचे प्रमुख म्हणाले

काँग्रेसने (Congress) आरएसएस आणि बजरंग दलावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला तर ते जळून राख होईल, असे नलिन कतील म्हणाले.

याआधी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसला आरएसएसवर बंदी घालण्याचे आव्हान दिले आहे. केंद्र सरकारशिवाय कुणालाही बंदी घालण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले होते.

काय होते प्रियांक खर्गे यांचे वक्तव्य?

विशेष म्हणजे, नुकतेच प्रियांग खर्गे यांनी कर्नाटकात सांप्रदायिकता पसरवून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास सरकार कठोर कारवाई करेल, असे वक्तव्य केले होते. असे सरकार त्या संघटनेवर बंदी घालण्यासही मागेपुढे पाहणार नाही. काँग्रेसनेही आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याची नमूद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT