Siddharamayya Vs DK Sivakumar Dainik Gomantak
देश

कर्नाटक काँग्रेसमध्ये कुणाची चलती...,सिद्धरामय्या की डीके शिवकुमार? मतभेद तीव्र

कर्नाटक काँग्रेसमधील कलह अलीकडच्या काळात अधिक तीव्र होत चालला आहे.

दैनिक गोमन्तक

Siddharamayya Vs DK Sivakumar: कर्नाटक काँग्रेसमधील कलह अलीकडच्या काळात अधिक तीव्र होत चालला आहे. पक्षाचे दोन प्रमुख नेते (विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख डीके शिवकुमार) एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करणे अधिकाधिक आव्हानात्मक बनत चालले आहे. तर दुसरीकडे, संयुक्त आघाडी स्थापन करण्याची पक्षाची शक्यताही कमी झाली आहे.

दरम्यान, जिल्हा पातळीवरील नेत्यांशी सल्लामसलत न करताच अन्य पक्षांच्या विद्यमान आणि माजी आमदारांसह अन्य नेत्यांना पक्षात समाविष्ट केल्याने तेढ वाढल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पक्षांतर्गत गटबाजीही वाढत आहे.

'सत्तावाटपाच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते'

या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, "मुख्य मुद्दा हा आहे की, मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कोणाची घोषणा केली जाईल. जर पक्षाने निवडणूक जिंकली तर शेवटी ही खुर्ची कोणाला दिली जाईल. पक्ष हायकमांड या दोघांना सत्ता देईल का? हा प्रश्नच आहे. शेअरिंग फॉर्म्युलावर काम करण्याचे निर्देश देऊ शकतात. तथापि, अद्याप असे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही."

दुसरीकडे, जनता दल (Secular) पक्षाचे आमदार श्रीनिवास गौडा यांनी अलीकडेच 10 जूनच्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होट करुन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचवेळी मुलबागलचे माजी आमदार कोथूर मंजुनाथ आणि माजी चिंतामणीचे आमदार एमसी सुधाकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर केएच मुनियप्पा यांच्यासारखे अनेत नेते या निर्णयांवर सिद्धरामय्या यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच, कर्नाटकचे (Karnataka) प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी कोलारमध्ये पक्षांतर्गत गटबाजीबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले, "के.एच. मुनियप्पा हे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांना खूप वर्षांचा अनुभव आहे. त्याचवेळी ते काँग्रेस (Congress) पक्षाला समर्पित आहेत. भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी आम्ही भूतकाळातील सर्व मतभेद विसरुन एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे."

शेवटी, या प्रकरणाशी परिचित असलेल्या आणखी एका व्यक्तीने सांगितले की, "कोलार जिल्ह्यात अजूनही वाद सुरु आहे. काँग्रेस नेते आणि मुनिअप्पा यांच्यात वाद सुरु आहे. या लोकांना पक्षात आणणाऱ्या केआर रमेश कुमार यांच्यावर मुनिअप्पा नाराज असल्याचे सांगितले जात आहे. कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार यांना 2019 च्या संसदीय निवडणुकीत मुनियप्पा यांच्या पराभवाचे मुख्य कारण मानले जाते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT