Mysuru Accident
Mysuru Accident Dainik Gomantak
देश

Mysuru Accident: म्हैसूरमध्ये भीषण अपघात, दोन मुलांसह 10 जणांचा मृत्यू; एक जण बचावला

Manish Jadhav

Mysuru Accident: कर्नाटकात सोमवारी दुपारी कार आणि खासगी बसची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. ही घटना म्हैसूरजवळील तनरसिंगपुरा येथील आहे. या अपघातात कारमधील एक जण थोडक्यात बचावला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, म्हैसूर एसपी सीमा यांनी 10 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस बचावकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. अथक परिश्रमानंतर मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले आहेत. ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. जखमीला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

कोप्पलमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला

याआधी रविवारी कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात कार एका लॉरीला धडकली होती. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, राजप्पा बांगोडी, राघवेंद्र, अक्षय शिवशरण, जयश्री, राखी आणि रश्मिका अशी मृतांची नावे आहेत. ही घटना कोप्पल जिल्ह्यातील कुश्तगी तालुक्यातील कालाकेरीजवळ घडली, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी पुढे सांगितले की, मृत विजयपूरहून बंगळुरुला जात असताना इंडिका कारचे टायर फुटले आणि एका लॉरीला धडकली. घटनेबाबत अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT