Kanpur training aircraft crash near Ganga Barrage Dainik Gomantak
देश

Kanpur Plane Crash: कानपूरमध्ये मोठी विमान दुर्घटना! पायलट अन् सह-पायलटचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ VIDEO

Kanpur Plane Crash Video: उत्तर प्रदेशातील कानपूर येथून एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना समोर आली. कानपूरमधील गंगा बॅरेजजवळील नत्थूपुरवा गावाजवळ गुरुवारी दुपारी एक विमान कोसळले.

Manish Jadhav

Kanpur Plane Crash Video: उत्तर प्रदेशातील कानपूर येथून एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना समोर आली. कानपूरमधील गंगा बॅरेजजवळील नत्थूपुरवा गावाजवळ एक विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानातील पायलट आणि सह-पायलट दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त झालेले विमान हे एका खाजगी कंपनीचे होते आणि त्याचा वापर नवशिक्या पायलट्सच्या प्रशिक्षणासाठी केला जात होता. गुरुवारी दुपारी हे विमान नियमित उड्डाणावर असताना अचानक गंगा बॅरेजजवळील नत्थूपुरवा गावाच्या शेतांमध्ये कोसळले. विमान जमिनीवर कोसळताच मोठा आवाज झाला, ज्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. भीषण अपघाताचा (Accident) आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळाकडे धावले.

दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, बचाव पथक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि प्रशासनाच्या टीमने त्वरित मदत आणि बचावकार्य सुरु केले. परंतु, विमान जोरदार कोसळल्याने मोठे नुकसान झाले आणि त्यातील पायलट तसेच सह-पायलट या दोघांनाही वाचवणे शक्य झाले नाही. वैद्यकीय पथकाने दोघांच्याही मृत्यूची अधिकृत पुष्टी केली.

हे विमान नेमके कोणत्या तांत्रिक कारणामुळे किंवा हवामानातील बदलामुळे दुर्घटनाग्रस्त झाले, याची अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सध्या पोलीस आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ यंत्रणांनी दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास सुरु केला आहे. अपघाताच्या ठिकाणावरुन विमानावरील महत्त्वाचे पुरावे आणि तांत्रिक अवशेष गोळा करण्याचे काम सुरु आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सोबत झालेला संपर्क यावरुन अपघातामागील मुख्य कारणाचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT