Kanpur Crime News Dainik Gomantak
देश

Kanpur Crime News: कारच्या छतावर बांधून दीड किमी फरफटत नेलं अन् नंतर चिरडलं... जुनी दुश्मनी ठरली जीवघेणी! कानपूरमध्ये तरुणाची निर्घुण हत्या VIDEO

Kanpur Brutal Murder News Dasara Night: उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली.

Manish Jadhav

Kanpur Crime News: उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. हनुमंत विहार भागात राहणाऱ्या वीरु सिंह भदौरिया नावाच्या 37 वर्षीय तरुणाची जुन्या वादातून अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली. दसऱ्याचा मेळावा पाहून घरी परतत असताना आरोपींनी त्याचे अपहरण करुन हत्या केली. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मृत वीरु सिंह एका मसाल्याच्या कंपनीत सेल्समन म्हणून काम करत होता आणि त्याला तीन लहान मुले आहेत. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, वीरुचा स्थानिक रहिवासी राजवीर आणि मेवालाल यांच्यासोबत आधी काही कारणांवरुन वाद झाला होता. याच जुन्या वैमनस्यातून आरोपींनी मंगळवारी रात्री हा भयानक कट रचला. आरोपी मेवालाल आणि त्याच्या साथीदारांनी आधी वीरुला मागून कारने जोरदार धडक दिली. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्याला कारच्या छतावर झोपवले आणि त्याचे दोन्ही हात कारच्या खिडक्यांच्या काचांमध्ये अडकवून लॉक केले. यानंतर त्याला दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेले आणि शेवटी कारखाली चिरडून त्याची निर्घृण हत्या केली.

दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी वीरुला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचे स्पष्ट सीसीटीव्ही फुटेज समोर येऊनही सुरुवातीला पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल न केल्याने संतप्त नातेवाईकांनी रस्त्यावर उतरुन जोरदार निदर्शने केली. पोलिसांच्या (Police) आश्वासनानंतर निदर्शने शांत झाली. आरोपींच्या कारचा नंबर ट्रेस झाला असून त्यांचे लोकेशन फतेहपूर परिसरात मिळाले. सध्या पोलीस पथके आरोपींच्या शोधात असून, त्यांना लवकरात लवकर बेड्या ठोकण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Suspension: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी मोठा धक्का! स्टार खेळाडूवर निलंबनाची कारवाई; नेमकी काय चूक केली?

Congress Party: 'राहुल गांधींची सभा पार्किंगच्या जागेत, ही काँग्रेसची नामुष्की’; दिगंबर कामत यांचा टोला

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिम भारतात? UNच्या रिपोर्टवर भारताचा तीव्र आक्षेप, कडक शब्दात ताकीद देत केला थेट सवाल

North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

Bhuvneshwar Kumar World Record: भुवनेश्वर कुमारचं टीम इंडियात कमबॅक! तब्बल 1,430 दिवसांनंतर केली गोलंदाजी, पहिल्याच 2 चेंडूंवर नोंदवला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT