Delhi Chief Minister Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Kanjhawala Case: केजरीवालांची मोठी घोषणा, अंजलीच्या कुटुंबीयांना दिली जाणार 10 लाखांची मदत

देशाची राजधानी दिल्लीत 20 वर्षीय तरुणी अंजलीवर झालेल्या अत्याचाराने दिल्लीसह संपूर्ण देश हादरला आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi Chief Minister Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कांजवाला प्रकरणातील पीडित अंजलीच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. केजरीवाल यांनी अंजलीच्या आईशी बोलून तिच्या उपचारासह 4 आश्वासने दिली. अंजलीला कायदेशीर मदत करण्यापासून न्याय मिळवून देण्यापर्यंत भविष्यात कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी ट्विट केले की, “पीडितेच्या आईशी बोललो. मुलीला न्याय मिळेल. अंजलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वात मोठे वकिल उभे करु. तिची आई आजारी राहते. त्यांच्यावर डॉक्टर पूर्ण उपचार करतील. पीडितेच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत देण्याची घोषणा मी करत आहे. सरकार पीडित कुटुंबासोबत आहे. भविष्यातही काही गरज पडली तर ती आम्ही पूर्ण करु.'' यापूर्वी सोमवारी केजरीवाल यांनी एलजी व्हीके सक्सेना यांच्याशी बोलून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. आज आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.

दुसरीकडे, वडिलांच्या मृत्यूनंतर, अजंली ह तिच्या आजारी आईसह संपूर्ण कुटुंबाचा एकमेव आधार होती. कुटुंबात ती एकटीच कमावती होती. 31 डिसेंबरच्या रात्री उशिरा ती पार्टी करुन तिच्या स्कूटीवरुन घरी परतत होती. वाटेतच तिची स्कूटी कारला धडकली आणि ती गाडीखाली आली. अंजलीला सुमारे 12 किलोमीटरपर्यंत या कारने फरफटत नेले. कांजवाला येथील रस्त्यावर ती नग्नावस्थेत आढळली.

तसेच, सुलतानपुरी येथे राहणारी अंजली एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत 'पार्ट टाइम' नोकरी करायची. पोलिसांनी सोमवारी कारमधील पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांवरही या प्रकरणी आरोप होत आहेत. या पाचही आरोपींना सोमवारी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी दारुच्या नशेत होते का, याचाही तपास सुरु आहे. आरोपींचे (Accused) म्हणणे आहे की, 'कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजत असल्याने गाडीखाली कोणीतरी आल्याचे आम्हाला समजलेच नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT