Kamal Nath to be Congress executive president? Dainik Gomantak
देश

कमलनाथ होणार कांग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष ?

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे(Congress) ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची वर्णी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर लागण्याची शक्यता वर्तवली जाती आहे

Dainik Gomantak

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची वर्णी काँग्रेसच्या(Congress) कार्यकारी अध्यक्ष पदावर लागण्याची शक्यता वर्तवली जाती आहे.

याच पार्शवभूमीवर कमलनाथ(Kamal Nath) दिल्लीत दाखल झाले आहेत, ते आता सोनिया(Sonia Gandhi)गांधी यांच्या निवासस्थानी बैठीकीसाठी या बैठकीला प्रियंका गांधीही उपस्थित आहेत.

कॉंग्रेस पक्षात मोठ्या बदलांच्या अनुमानांच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे . मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कॉंग्रेस पक्षाचे अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी हि बैठक पार पडली असून . दोन्ही नेत्यांमध्ये ही बठक एका तासापेक्षा जास्त काळ चालली. या बैठकीत कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना संघटनेत मोठी जबाबदारी सोपविली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कॉंग्रेस संघटनेत अहमद पटेल यांचे निधन झाल्यापासून कमलनाथ यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अलीकडे प्रशांत किशोर यांनी दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींची भेट घेतली तेव्हा कमलनाथ यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यापूर्वी जी -20 च्या वादाच्या वेळीही कमलनाथ यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जात होते. म्हणूनच असा विश्वास आहे की कमलनाथ यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली जाऊ शकते. दरम्यान, याच पार्शवभूमीवर सोनिया गांधींशी त्यांची ही भेट महत्त्वाची मनाली जात आहे.

कमलनाथ यांच्याकडे सध्या मध्य प्रदेशात दोन पदे आहेत. एक, ते मध्य प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुद्धा आहेत. या बैठकीनंतर अशी शक्यता वर्तविली जात आहे की आता त्यांना कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्षही केले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

SCROLL FOR NEXT