Justice DY Chandrachud Dainik Gomantak
देश

CJI India: न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती; 9 नोव्हेंबरला घेणार शपथ

10 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल.

गोमन्तक डिजिटल टीम

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश (Chief Justice Of India) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. घटनेच्या अधिकारानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी ही नियुक्ती केली आहे. देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड 9 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल.

देशाचे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. किरेन रिजिजू यांनी डीवाय चंद्रचूड यांना 9 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या औपचारिक शपथविधीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या जागी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती लळीत 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

संक्षिप्त प्रवास

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. 1978 ते 1985 या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. मे 2016 मध्ये न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता.

वडीलही होते सरन्यायाधीश

विशेष म्हणजे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हे देखील देशाचे सरन्यायाधीश (1978 ते 1985 ) आहेत. सर्वाधिक काळ CJI राहण्याचा विक्रमही वायव्ही चंद्रचूडच्या नावावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

One Goa Project Stay: कारापूरमधील 'लोढा' प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; बांधकामासह परवानग्यांना स्थगिती

रिंगमधील 'तो' सामना ठरला अखेरचा! Crown Jewel मध्ये भीषण धडक! बरगड्या अन् किडनीला दुखापत, वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी WWE सुपरस्टारचं निधन

Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड'च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यास काँग्रेस तयार; माणिकराव ठाकरे यांचे संकेत

Chandra Gochar 2026: नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग! चंद्राच्या गोचरने 'या' 3 राशींना अच्छे दिन; मिळणार आनंदाची बातमी

IND vs NZ: क्राइस्टचर्च कसोटीत आकाश दीप चमकला! न्यूझीलंडविरुद्ध रचला नवा इतिहास; 5 बळी घेत केला खास रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT