College sexual assault Dainik Gomantak
देश

ज्युनिअरने लास्ट ईअरच्या विद्यार्थीनींवर कॉलेजच्या बाथरुममध्ये केला लैंगिक अत्याचार; अत्याचारानंतर म्हणाला, 'गोळी हवी का'?

Sexual harassment in college: मुलगी ब्लॉकमध्ये आल्यानंतर त्याने जबरदस्तीने तिला ओढून किस केला आणि मुलांच्या वॉशरुममध्ये घेऊन गेला.

गोमंतक ऑनलाईन टीम

ज्युनिअर विद्यार्थ्यांने कॉलेजच्या अखेरच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनींवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बंगळुरु येथील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात ही घटना घडली. हनुमंतनगर पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपी जीवन गौवडा याला अटक केली आहे.

पीडित विद्यार्थ्यीनी बी.टेकच्या सातव्या सत्रात शिक्षण घेत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ती संशयित जीवनला ओळखत आहे. १० ऑक्टोबर रोजी त्याने पीडितेला वारंवार फोन करुन आर्किटेक ब्लॉकमध्ये येण्याची विनंती केली. मुलगी ब्लॉकमध्ये आल्यानंतर त्याने जबरदस्तीने तिला ओढून किस केला आणि मुलांच्या वॉशरुममध्ये घेऊन गेला.

संशयित जीवनने पीडितेवर दीड ते दोन या कालावधीत जबरदस्तीने बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पालकांना माहिती देण्यापूर्वी तिने सुरुवातीला मित्रांना याबाबत माहिती दिली.

यानंतर १५ ऑक्टोबर रोजी याप्रकरणी रितसर पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. अत्याचारानंतर संशयिताने पीडितेला गोळी हवीये का? अशी विचारणा केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी घटना घडलेल्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, यात कोणतीही संशयित घटना घडल्याचे आढळून आलेले नाही. दरम्यान, फॉरेन्सिक टीम याबाबतचे डिजिटल आणि उपलब्ध पुरावे तापसून पाहत आहे. संशयित आरोपी आणि पीडित विद्यार्थीनी एकाच डिपार्टमेंटशी निगडीत आहेत. दरम्यान, पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT