Joe Root Dainik Gomantak
देश

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

Joe Root Record: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच गोलंदाजाविरुद्ध 600 पेक्षा जास्त धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.

Manish Jadhav

Joe Root Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. या मालिकेत अनेक विक्रम नोंदवले गेले, पण इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटने (Joe Root) एक असा अनोखा विक्रम केला, ज्याची कल्पना कोणीही केली नसेल. कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) एकाच गोलंदाजाविरुद्ध (Bowler) 600 पेक्षा जास्त धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला.

रवींद्र जडेजाविरुद्ध 600 धावा

  • या मालिकेत जो रुटने शानदार फलंदाजी केली. त्याने 5 कसोटी सामन्यांत 3 शतके आणि 1 अर्धशतकासह एकूण 537 धावा केल्या. या धावांमध्ये त्याने भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या गोलंदाजीवर 600 पेक्षा जास्त धावा केल्या.

  • विक्रम: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच गोलंदाजाविरुद्ध 600 पेक्षा जास्त धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.

  • पूर्वीचा विक्रम: याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) नावावर होता. त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध 577 धावा केल्या होत्या.

भारतीय खेळाडू: भारतीय फलंदाजांमध्ये हा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या नाथन लॉयनविरुद्ध (Nathan Lyon) 573 धावा केल्या आहेत. तसेच, चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) लॉयनविरुद्ध 571 धावा केल्या आहेत.

हा विक्रम मोडणे कठीण

जो रुटने (Joe Root) केलेला हा विक्रम मोडणे सध्या तरी कठीण आहे. कारण या यादीतील इतर खेळाडूंची स्थिती पाहता, त्यांचे 600 धावांचा टप्पा गाठणे शक्य नाही. स्टुअर्ट ब्रॉड निवृत्त झाला आहे. विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. चेतेश्वर पुजारा संघात नाही आणि त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रुटने केलेला हा विक्रम सध्या तरी अबाधित राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election 2026: रणधुमाळीत जाहीर प्रचाराची सांगता, हायकोर्टाच्या निकालावर फोंडा पोटनिवडणुकीचं भवितव्‍य; भाजपसह काँग्रेस, आपची ताकद पणाला

Horoscope 8 April 2026: आजचा दिवस तुमच्यासाठी खास! 'या' राशींना मिळणार नवीन नोकरीची संधी; अडकलेले पैसेही परत मिळणार

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

SCROLL FOR NEXT