girls school  Dainik Gomantak
देश

Jharkhand: धक्कादायक! शाळेतील 80 मुलींना शर्ट काढण्याचा मुख्याध्यापकांनी दिला आदेश; वाचा काय आहे नेमकं प्रकरण?

झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धनबाद जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत 80 मुलींना त्यांचे शर्ट काढण्याचे आदेश देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धनबाद जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत 80 मुलींना त्यांचे शर्ट काढण्याचे आदेश देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (11 जानेवरी) याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांवर 10 वीच्या 80 विद्यार्थिनींना संदेश लिहिण्यासाठी त्यांचे शर्ट काढण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. प्रशासनाने या आरोपांची चौकशी सुरु केली आहे.

असा आरोप आहे की, मुलींना शर्टशिवाय ब्लेझर घालून घरी परतण्यास भाग पाडण्यात आले. धनबादच्या उपायुक्त (डीसी) माधवी मिश्रा यांनी सांगितले की, शुक्रवारी जोरापोखरा पोलिस स्टेशन हद्दीतील दिगवाडीह येथील एका शाळेत ही घटना घडली. मुलींच्या तक्रारीवर पालक संतापले.

पालकांनी डीसीकडे केलेल्या तक्रारीत म्हटले की, परीक्षा दिल्यानंतर, दहावीचे विद्यार्थी एकमेकांच्या शर्टवर संदेश लिहून 'पेन डे' साजरा करत होते. मुख्याध्यापकांनी यावर आक्षेप घेतला आणि विद्यार्थिनींना त्यांचे शर्ट काढण्यास सांगितले. तथापि, नंतर त्यांनी या कृत्याबद्दल माफी मागितली. पालकांनी डीसींना सांगितले की, सर्व विद्यार्थिनींना ब्लेझर घालून शर्टशिवाय घरी परत पाठवण्यात आले.

धनबादच्या उपायुक्त (डीसी) माधवी मिश्रा यांनी पुढे सांगितले की, अनेक पालकांनी मुख्याध्यापकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आम्ही काही पीडित मुलींशीही बोललो. प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या चौकशी समितीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे.

मिश्रा यांनी शेवटी सांगितले की, चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल. शनिवारी पालकांनी मुख्याध्यापकांविरुद्ध तक्रार दाखल केली तेव्हा झरियाच्या आमदार रागिनी सिंह देखील त्यांच्यासोबत डीसी कार्यालयात उपस्थित होत्या, असे सांगितले जाते. झरियाच्या आमदार रागिनी सिंह यांनी ही घटना लज्जास्पद आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT