Viral Video Dainik Gomantak
देश

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

Jharkhand Police Scandal: झारखंडमधील गढवा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Jharkhand Police Scandal: झारखंडमधील गढवा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली. येथे एका पोलीस अधिकाऱ्याच्या शासकीय निवासस्थानात हा 'हाय-व्होल्टेज ड्रामा' घडला. पोलीस अधिकारी एका महिलेसोबत त्यांच्या घरात झोपला असताना, त्याची पत्नी अचानक तिथे पोहोचली आणि तिने त्या दोघांनाही घरामध्ये कोंडून टाकले. यानंतर हे साहेब दरवाजा उघडण्यासाठी पत्नीची विनवणी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र पत्नीने दरवाजा न उघडल्याने सीओ साहेबांनी खिडकीतून उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्यांना दुखापत देखील झाली.

सकाळ होताच पत्नी पोहोचली आणि...

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 1 नोव्हेंबर रोजी घडली. मझियावां येथील सर्कल ऑफिसर (CO) प्रमोद कुमार हे त्यांच्या सरकारी निवासस्थानात एका अन्य महिलेसोबत होते. याबाबतची माहिती त्यांच्या पत्नीला, डॉ. श्यामा रानी यांना मिळाली. पत्नी श्यामा रानी या सकाळी-सकाळीच त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या.

घरात पतीला दुसऱ्या महिलेसोबत (Women) पाहिल्यानंतर पत्नीला धक्का बसला आणि तिने तातडीने घराचा दरवाजा आतून बंद केला. यामुळे घरात एकच गोंधळ उडाला. सीओ साहेबांच्या घराबाहेर मोठी गर्दी जमली. या संपूर्ण 'हाय-व्होल्टेज ड्रामा'चा व्हिडिओ अनेक लोकांनी रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पळण्याचा प्रयत्न आणि दुखापत

सीओ साहेबांना पत्नीने घरात कोंडून ठेवल्यानंतर त्यांचे धाबे दणाणले. सुरुवातीला त्यांनी पत्नीला समजावण्याचा आणि तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी डॉ. श्यामा रानी यांनी दरवाजा उघडण्यास स्पष्ट नकार दिला. त्याचवेळी, त्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर बघ्यांची गर्दी जमत असल्याची आणि पोलीस फोर्स येत असल्याची माहिती सीओ साहेबांना मिळाली. पोलीस (Police) आपल्या निवासस्थानाकडे येत असल्याचे कळताच सीओ प्रमोद कुमार यांचे धाबे दणाणले आणि त्यांनी घरातून उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ते जखमी देखील झाले.

बिहारच्या माजी खासदाराची कन्या

मिळालेल्या माहितीनुसार, सीओ प्रमोद कुमार यांची पत्नी डॉ. श्यामा रानी या बिहारचे माजी खासदार रामजी मांझी यांच्या कन्या आहेत. पत्नी डॉ. श्यामा रानी यांना गेल्या काही दिवसांपासून आपल्या पतीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्यांनी सापळा रचून ही सत्यता समोर आणली. पत्नीने घरात कोंडल्यानंतर झालेल्या या संपूर्ण घटनेमुळे पोलीस विभागाची मोठी नाचक्की झाली आहे. गढवा पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून शासकीय निवासस्थानात घडलेल्या या गैरवर्तनाबद्दल सीओ प्रमोद कुमार यांच्यावर विभागीय कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT