Ayodhya Ram Mandir  Dainik Gomantak
देश

Ram Mandir: जगाच्या नजरा अयोध्येकडे! 5 कोटींहून अधिक पर्यटकांना रामनगरची ओढ...

Manish Jadhav

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाचा अभिषेक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाची झलक देशातच नव्हे तर जगभरात पाहायला मिळाली. राम मंदिराचे उद्घाटन हे लोकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र असताना, 85,000 कोटी रुपयांच्या अयोध्येच्या मेकओव्हरमुळे आता आर्थिक प्रभावही दिसून आहेत. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजने राम मंदिराबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की ते भारतातील पर्यटन क्षमता अनलॉक करु शकते.

दरम्यान, जेफरीजने आपल्या अहवालात राममंदिराच्या आर्थिक प्रभावाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. अयोध्या आणि राम मंदिर दरवर्षी 5 कोटींहून अधिक पर्यटकांना आकर्षित करेल, असे सांगण्यात आले आहे. ब्रोकरेज म्हणते की, अयोध्या राममंदिर एक लक्षणीय मोठा आर्थिक प्रभाव निर्माण करु शकते. विशेष म्हणजे, अनेक विमान कंपन्यांनी अयोध्येला त्यांची उड्डाणे सुरु केली आहेत, टाटांच्या इंडियन हॉटेल्स लिमिटेडसह अनेक कंपन्यांनी हॉसपिटॅलिटी सेक्टरमध्ये त्यांचे प्रोजेक्ट सुरु केले आहेत.

अयोध्येतील राम मंदिरात आज (22 जानेवारी रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भगवान श्रीरामाच्या 5 वर्ष जुन्या राधव रुपाचा अभिषेक करण्यात आला. जेफरीजनेही याच पवित्र दिवशी हा अहवाल शेअर केला आहे. जेफरीज विश्लेषकांनी म्हटले आहे की, अयोध्येतील राम मंदिराचा मोठा आर्थिक प्रभाव दिसून येईल, कारण भारताला एक नवीन पर्यटन स्थळ मिळाले आहे, जे दरवर्षी पाच कोटींहून अधिक भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करेल. अहवालात असेही म्हटले आहे की, 85,000 कोटी रुपयांच्या मेकओव्हरमध्ये नवीन विमानतळ, नूतनीकरण केलेले रेल्वे स्टेशन, टाउनशिप, उत्तम रोड कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे.

दररोज 1-1.5 लाख भाविक येणार आहेत

जेफरीजच्या म्हणण्यानुसार, सुमारे 70 एकरांवर पसरलेले मुख्य तीर्थक्षेत्र एकाच वेळी सुमारे 10 लाख भाविकांना होस्ट करण्यासाठी तयार केले गेले आहे. येथे दररोज येणा-या यात्रेकरुंची संख्या 1-1.5 लाखांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारताच्या पर्यटन क्षेत्रात धार्मिक पर्यटनाचा अजूनही मोठा वाटा असल्याचे अहवालात म्हटले आहे. देशातील अनेक लोकप्रिय धार्मिक केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांच्या अडचणी असूनही सुमारे 3 कोटी पर्यटकांना आकर्षित करतात आणि आता अयोध्येचे नवीन धार्मिक पर्यटन केंद्र उत्तम कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांसह बांधले गेले आहे, जे या क्षेत्रात बूस्टर म्हणून काम करेल.

1800 कोटी रुपये खर्चून मंदिर तयार होणार!

ब्रोकरेज अहवालातील डेटा जारी करताना असे म्हटले आहे की, अयोध्या हे एक प्राचीन शहर आहे आणि आता ते जागतिक धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन केंद्रात रुपांतरित होण्यास तयार आहे. नवीन राम मंदिर 1,800 कोटी रुपये खर्चून पूर्णपणे तयार होणार आहे. अयोध्येतील राम मंदिरामुळे हॉटेल्स, एअरलाइन्स, हॉस्पिटॅलिटी, एफएमसीजी, ट्रॅव्हल अॅडव्हायझर, सिमेंट यासह अनेक क्षेत्रांना फायदा होणार आहे. जेफरीजच्या मते, पर्यटनाने FY2019 (प्री-कोविड) GDP मध्ये $194 अब्ज योगदान दिले आहे आणि FY2033 पर्यंत 8% CGR ने वाढून $443 अब्ज होण्याची अपेक्षा आहे.

अयोध्येत कंपन्यांचा मेळा

एकीकडे, IndiGo, Air India, SpiceJet, Akasha Air ने अयोध्येचा हवाई प्रवास सुलभ करण्यासाठी तयारी केली आहे, तर दुसरीकडे IRCTC ने अयोध्येसाठी टूर पॅकेज जाहीर केले आहेत. जेफरीजने भारतीय हॉटेल कंपनी आणि EIH हॉटेल क्षेत्रातील संभाव्य लाभार्थी म्हणून ओळखले आहे, तर FMCG आणि QSR क्षेत्रातील ITC, जुबिलंट फूडवर्क्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्युमर, वेस्टलाइफ फूडवर्ल्ड, हिंदुस्तान युनिलिव्हर, देवयानी इंटरनॅशनल आणि सॅफायर फूड्स यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT