Sleeper Cell Busted South Kashmir Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश, दक्षिण काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापेमारी; पाकड्यांना अद्दल घडवल्यानंतर कारवाई

Sleeper Cell Busted South Kashmir: राज्य तपास यंत्रणेला एक मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापेमारी करुन स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश केला.

Manish Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्कराने सर्च ऑपरेशन तीव्र केले आहे. यादरम्यान राज्य तपास यंत्रणेला एक मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापेमारी करुन स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश केला. यावेळी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या. तसेच, काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले, ज्यांची चौकशी सुरु आहे.

राज्य पोलिसांची कारवाई

राज्य तपास संस्थेने (SIA) दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीर (Jammu And Kashmir) पोलिस काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी सहकाऱ्यांवर आणि ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGW) वर लक्ष ठेवून आहेत. काश्मीरमधील अनेक स्लीपर सेल पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या आकांशी थेट संपर्कात होते. ते व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, सिग्नल इत्यादी मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे सुरक्षा दल आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांबद्दल संवेदनशील आणि धोरणात्मक माहिती पुरवण्यात गुंतलेले होते. असे सांगितले जात आहे की, हे दहशतवादी सहकारी लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कमांडर्सच्या आदेशानुसार ऑनलाइन कट्टरपंथी प्रचारात देखील सहभागी होते, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडतेला धोका निर्माण झाला होता.

20 ठिकाणी छापेमारी

एसआयएने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले. छाप्यादरम्यान, मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. तर संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, या संस्था दहशतवादी (Terrorist) कटात सक्रियपणे सहभागी असून भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला आव्हान देण्यासाठीच नव्हे तर असंतोष, सार्वजनिक अव्यवस्था आणि सांप्रदायिक द्वेष निर्माण करण्यासाठी देखील भारतविरोधी कारवाया करत आहेत.

भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला

22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देश हादरुन गेला होता. लोक दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत होते. यानंतर, भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेतली आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, पाकिस्तान आणि पीओकेवर हल्ले करुन 9 दहशतवादी तळ नष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT