Jammu kashmir
Jammu kashmir Dainik Gomantak
देश

Jammu kashmir: स्वातंत्र्य दिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट फसला, लष्कराच्या छावणीत घुसलेल्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी राजौरीतील लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले, "राजौरीच्या परगल, दारहाल भागात कोणीतरी लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला, त्यादरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दारहाळ पोलिस ठाण्यापासून सहा किलोमीटर अंतरापर्यंत अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत. यात दोन दहशतवादी ठार झाले असून लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत.

स्वातंत्र्य दिनापूर्वी देशाला हादरवून सोडण्यासाठी दहशतवादी संघटना सतत कोणतीही मोठी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. गुप्तचर यंत्रणा सतर्क आहेत आणि भारतीय सुरक्षा दले दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे उधळून लावत आहेत. राजौरी येथील लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उरी हल्ल्याची आठवण करून देणारा आहे.

त्याच धर्तीवर 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळील भारतीय लष्कराच्या छावणीत घुसून दहशतवाद्यांनी झोपलेल्या भारतीय जवानांवर हल्ला केला होता. झोपलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात लष्कराचे 16 जवान शहीद झाले. त्याचवेळी लष्कराच्या कारवाईत चार दहशतवादी मारले गेले. 20 वर्षांतील भारतीय लष्करावरील हा सर्वात मोठा हल्ला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT