Earthquake Dainik Gomantak
देश

Earthquake in Jammu Kashmir: कारगिल आणि लडाखमध्ये 5.5 रिश्टर स्केलचा भूकंप; उत्तर भारतात जाणवले हादरे

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कारगिल आणि लडाखमध्ये आज दुपारी 3.48 च्या सुमारास भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी मोजली गेली.

Manish Jadhav

Earthquake in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कारगिल आणि लडाखमध्ये आज दुपारी 3.48 च्या सुमारास भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.5 इतकी मोजली गेली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे. भूकंपामुळे जीवित वा मालमत्तेची हानी झाली की नाही याबबत अद्याप माहिती नाही. या संदर्भातील अपडेटची सध्या प्रतीक्षा आहे. (Jammu Kashmir Earthquake News)

दरम्यान, भूकंपाची तीव्रता किंचित कमी असल्याने अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भूकंपानंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. याआधी 2 डिसेंबरलाही लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 मोजण्यात आली होती. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, हा भूकंप सकाळी 8.25 वाजता झाला होता. त्याचे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खाली होते.

ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात अनेक भूकंप

गेल्या काही महिन्यांत देशाच्या इतर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. विशेषतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एकापाठोपाठ एक भूकंपाचे अनेक धक्के जाणवले होते. यातील सर्वाधिक वेळा भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये नोंदवले गेले. या धक्क्यांमुळे उत्तर प्रदेश, बिहार आणि राजधानी दिल्लीपर्यंत हादरे जाणवले होते.

नेपाळमध्ये नोव्हेंबर महिन्यात भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला होता

दुसरीकडे, यावर्षी 3-4 नोव्हेंबरच्या रात्री नेपाळमध्ये सर्वात तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 मोजण्यात आली. या भूकंपामुळे नेपाळमधील अनेक भागांमध्ये विध्वंसही झाला. भूकंप किती विनाशकारी होता, याचा अंदाज यावरुन लावता येतो की, नेपाळमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक घरे जमीनदोस्त झाली. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT