Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही; राहुल गांधी

2014 पासून हिंदुत्ववादी सत्तेत आहेत, आता त्यांना हटवावे लागेल: राहुल गांधी

दैनिक गोमन्तक

राजस्थानची (Rajasthan) राजधानी जयपूरमध्ये काँग्रेस (Congress) पक्षाने महागाई हटवण्याच्या मागणीसाठी देशव्यापी रॅली काढली. या रॅलीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक बडे नेते पोहोचले. या रॅलीत राहुल गांधींनी हिंदू आणि हिंदुत्वातील फरक लोकांना समजावून सांगितला, तिथेच प्रियांका गांधी यांनी शेतकरी आणि महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला (Central Government) घेरले. ही रॅली आधी दिल्लीत होणार होती, पण एनसीआरमध्ये रॅलीला परवानगी नसल्यामुळे ती जयपूरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

देशातील वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे रविवारी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये 'महागाई हटाओ महारॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे अनेक बडे नेते शनिवारी संध्याकाळी जयपूरला पोहोचले आहेत.

मी हिंदू (Hindu) आहे पण हिंदुत्ववादी नाही : राहुल गांधी

जयपूरमध्ये महागाईविरोधात आयोजित रॅलीत राहुल गांधींनी ऑफ ट्रॅक भाषणाला सुरुवात केली. राहुल यांनी हिंदू आणि हिंदुत्व यातील फरक स्पष्ट केला. ते म्हणाले की जो हिंदू आहे तो प्रत्येक धर्माला मानतो पण जो हिंदुत्ववादी आहे तो कोणत्याही धर्माला मानत नाही. तो फक्त हिंसाचारावर विश्वास ठेवतो. ते म्हणाले की, मी हिंदू असून अहिंसेवर विश्वास ठेवतो. महात्मा गांधी हे हिंदू होते आणि गोडसे हे हिंदुत्ववादी होते, असे ते म्हणाले. सध्याचे केंद्र सरकार हे हिंदुत्ववादी असून त्यांचे काम फक्त एकमेकांना मारणे आहे. सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात.

2014 पासून हिंदुत्ववादी सत्तेत आहेत, आता त्यांना हटवावे लागेल: राहुल गांधी

हिंदुत्ववाद्यांचा सत्याशी काहीही संबंध नाही, असे राहुल गांधी म्हणाले. सत्याच्या शोधात हिंदू कधीच झुकत नाही पण हिंदुत्व द्वेषाने भरलेले आहे. तुम्ही सर्व हिंदू आहात. हिंदुत्व हे सत्तेचे भुकेले आहेत. 2014 पासून हिंदुत्ववादी सत्तेत आहेत, हिंदू सत्तेबाहेर आहेत. या हिंदुत्ववादींना हटवून हिंदूंना सत्तेवर आणायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT