ISRO Dainik Gomanatk
देश

ISRO चा प्रक्षेपणासाठी चार देशांशी करार

इस्रोने 1975 पासून 36 देशांचे 342 परदेशी उपग्रह तर भारतीय वंशाचे 129 उपग्रह अवकाशात पाठवले.

दैनिक गोमन्तक

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने 1975 पासून भारतीय वंशाचे एकूण 129 आणि 36 देशांचे 342 परदेशी उपग्रह सोडले आहेत. अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. विदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातूनही इस्रोला कमाई होते हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. इस्रोने गेल्या तीन वर्षांत परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातून 80 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

इस्रोने प्रक्षेपित केलेले बहुतेक परदेशी उपग्रह हे पृथ्वी निरीक्षण, वैज्ञानिक प्रयोग आणि तांत्रिक प्रात्यक्षिकांसाठी होते. वास्तविक, इस्रो (ISRO) ही जगातील सर्वात स्वस्त प्रक्षेपण करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. यामुळे अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडासारखे देशही प्रक्षेपणासाठी इस्रोशी संपर्क साधतात. बहुतेक परदेशी प्रक्षेपण हे लहान आणि मध्यम आकाराच्या उपग्रहांचे आहेत. यासाठी जगभरातील देश भारताच्या अंतराळ संस्थेशी संपर्क साधतात. भारताने गेल्या काही दशकांमध्ये अवकाश क्षेत्रात आपली वाढ मजबूत केली आहे.

प्रक्षेपणासाठी इस्रोचा चार देशांशी करार

2021 मध्ये डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने संसदेत सांगितले होते की, विदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी इस्रोने चार देशांशी सहा करार केले आहेत. यातून 132 दशलक्ष युरो मिळतील. राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की ISRO ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) मध्ये इतर देशांचे उपग्रह त्यांच्या व्यावसायिक युनिट न्यूजस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) द्वारे व्यावसायिक आधारावर प्रक्षेपित करत आहे.

जितेंद्र सिंह म्हणाले की NSIL ने 2021-2023 या वर्षात PSLV द्वारे अंतराळात परदेशी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी चार देशांतील ग्राहकांसोबत सहा प्रक्षेपण सेवा करार केले आहेत. या परदेशी उपग्रहांचे व्यावसायिक तत्त्वावर प्रक्षेपण केल्याने सुमारे 132 दशलक्ष युरो महसूल प्राप्त होणार आहे.

अंतराळ विभागाचे बजेट वाढले

अंतराळ क्षेत्रातील विकासाला गती देण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यामुळेच 2022-23 च्या अर्थसंकल्पात (Budget) यावेळी अंतराळ विभागासाठी 13,700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या 12,642 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाच्या वाटपात 1058 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या वाटपाचा मोठा भाग (रु. 10,534 कोटी) अंतराळ तंत्रज्ञान अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामध्ये ISRO च्या बहुतांश केंद्रांचा समावेश आहे. इस्रो या वर्षाच्या अखेरीस गगनयान अंतर्गत देशातील पहिली मानवरहित अंतराळ मोहीम प्रक्षेपित करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

SCROLL FOR NEXT