Space Technology Dainik Gaumantak
देश

Space Technology: इस्रो आणि मायक्रोसॉफ्ट एकत्र

Space Technology: आता इस्रोने खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टशी हातमिळवणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Space Technology: गेल्या काही वर्षात सरकारी क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढला आहे.आर्थिक ध्येय प्राप्त करण्यासाठी खाजगी क्षेत्राला सरकार प्राधान्य देत आहे. आता यामध्ये आणखी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

इस्त्रो आणि मायक्रोसॉफ्ट आता एकत्र येऊन काम करणार आहेत. ISRO ने देशाच्या अवकाश संशोधनात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरुकेले आहेत. अलीकडेच भारताने खाजगी क्षेत्रात विकसित केलेल्या रॉकेटची पहिली चाचणी घेतली. आता इस्रोने खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टशी हातमिळवणी केली आहे.

अंतराळ तंत्रज्ञानाशी आधारित जे स्टार्टअप्स येतील त्यांना आधार देण्यासाठी इस्त्रो आणि मायक्रोसॉफ्ट एकत्र काम करतील अशी अधिकृत माहीती इस्त्रोकडून देण्यात आली होती.यामुळे देशभरातील अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप्सची ताकद वाढेल,असा विश्वास इस्रो आणि मायक्रोसॉफ्ट या दोघांनाही आहे. स्टार्टअप कंपन्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी लागणारी तांत्रिक साधने आणि संसाधने मिळू शकतील.

इस्रो( ISRO )चे प्रमुख एस सोमनाथ यांनी म्हटले आहे की, या करारामुळे स्पेस टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप कंपन्यांना खूप फायदा होणार आहे. डीप लर्निंग, मशीन लर्निंग आणि एआय सारख्या प्रगत तंत्रज्ञानाद्वारे विविध ऍप्लिकेशन्समध्ये भरपूर सॅटेलाइट डेटाचे विश्लेषण आणि प्रक्रिया करू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT