ISIS Dainik GOmantak
देश

ISIS का करतेय रोबोट्स, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची भरती? एनआयए कडून भारताबाबत धक्कादायक खुलासे

या प्रकरणातील आरोपींनी ISIS च्या कटाचा भाग म्हणून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी अनेक ठिकाणी हल्ले आणि जाळपोळ करण्याची योजना आखली होती.

Ashutosh Masgaunde

ISIS is recruiting robots mechanical and electrical engineers: हशतवादी संघटना 'इसिस' आपल्या दहशतवाद्यांमार्फत भारतात रोबोटच्या माध्यमातून दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचत आहे. यासाठी ISIS ने भारतात असलेल्या आपल्या अनेक सदस्यांना 'रोबोटिक्स कोर्स'चा कोर्स करण्यास सांगितले होते.

आगामी काळात भारतात मोठ्या हल्ल्यांसाठी रोबोट तयार करणे हा दहशतवादी संघटनेचा उद्देश आहे.

गर्दीची ठिकाणे, बहुमजली इमारती, लष्करी प्रतिष्ठाने आणि रस्त्यावर धावणारी वाहने या रोबोटच्या माध्यमातून लक्ष्य केले जाऊ शकते. जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील भागात, जेथे लष्करी दलांचे लांब तोफे फिरतात, तेथे दहशतवादी रोबोट धोकादायक ठरू शकतात.

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शुक्रवारी कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील ISIS कट प्रकरणात नऊ जणांविरुद्ध पहिले पुरवणी आरोपपत्र दाखल केले. ISIS ही दहशतवादी संघटना आता हल्ल्यांसाठी रोबोटची मदत घेऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातील आरोपींनी इस्लामिक स्टेट (ISIS) च्या कटाचा भाग म्हणून लोकांमध्ये दहशत आणि भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने अनेक ठिकाणी हल्ले आणि जाळपोळ करण्याची योजना आखली होती.

यासाठी दहशतवाद्यांनी विविध ठिकाणांची रेकी केली होती. मालमत्तेची आणि वाहनांची जाळपोळ करण्याव्यतिरिक्त, शिवमोग्गा येथे सप्टेंबर 2022 मध्ये चाचणी IED स्फोट देखील करण्यात आला. दहशतवाद आणि हिंसाचाराच्या माध्यमातून भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचा त्यांचा उद्देश होता.

मोहम्मद शारीक (25), मेजर मुनीर अहमद (23), सय्यद यासीन (22), रिशान थाजुद्दीन शेख (22), हुजैर फरहान बेग (22), माजीन अब्दुल रहमान (22), नदीम अहमद केए (22), जबिउल्लाह (32) आणि नदीम फैजल एन (27) अशी आरोपींची नावे आहेत.

हे सर्वजण कर्नाटकचे रहिवासी आहेत. या सर्वांवर UA(P) कायदा 1967, IPC आणि KS प्रिव्हेंशन ऑफ डिस्ट्रक्शन अँड लॉस ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, 1981 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. मेजर मुनीर अहमद आणि सय्यद यासीन यांच्यावर या वर्षी मार्चमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आता त्याच्यावर इतर गुन्ह्यांचा आरोप आहे.

नऊ आरोपींपैकी मेजर मुनीर अहमद, सय्यद यासीन, रिशान थाजुद्दीन शेख, माजीन अब्दुल रहमान आणि नदीम अहमद केए यांनी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

भारताl आएसचा अजेंडा पुढे नेण्यासाठी भविष्यात दहशतवादी हल्ले करण्यासाठी विशेष कौशल्य आत्मसात करण्याचे काम त्याला देण्यात आले होते. परदेशात असलेल्या ISIS च्या हँडलर्सनी त्याला रोबोटिक्सचा कोर्स करण्यास सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT