Calcutta High Court Dainik Gomantak
देश

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

Calcutta High Court: महिलांना 'स्वीटी' किंवा 'बेबी' म्हणणे नेहमीच चुकीचे नसते, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका निर्णयात स्पष्ट केले आहे.

Manish Jadhav

Calcutta High Court: महिलांना 'स्वीटी' किंवा 'बेबी' म्हणणे नेहमीच चुकीचे नसते, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका निर्णयात स्पष्ट केले आहे. न्यायालयाने सांगितले की, ही नावे विशिष्ट सामाजिक वर्तुळात महिलांसाठी प्रचलित आहेत आणि या शब्दांचा प्रयोग केल्याने एखाद्याच्या लैंगिक भावना नेहमीच प्रकट होत नाहीत. बार आणि बेंचच्या रिपोर्टनुसार, कोलकाता उच्च न्यायालयाने याच निकालात असा इशारा दिला की, जर कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याचा (POSH कायदा) गैरवापर झाला तर ते महिलांसाठी आणखी अडथळे निर्माण करु शकतात. कारण न्यायमूर्ती सब्यसाची भट्टाचार्य यांनी लैंगिक छळाच्या आरोपांसह एका खटल्याची सुनावणी करताना ही टिप्पणी केली.

महिलेचा वरिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप

याप्रकरणी एका महिलेने आरोप केला होता की, कामाच्या ठिकाणी तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वीटी आणि बेबी अशा शब्दांचा प्रयोग केला होता. कोस्ट गार्ड कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याने तिच्या वरिष्ठाने अनेक प्रकारे लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तक्रारदार महिलेने आपल्या याचिकेत असा युक्तिवाद केला की, वरिष्ठ अधिकाऱ्याकडून करण्यात आलेल्या शब्द प्रयोगाचा ‘लैंगिक अर्थ’ आहे.

तथापि, वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की, त्यांनी या शब्दांचा प्रयोग कधीही लैंगिक अर्थाने केला नाही. तक्रारदाराने विरोध दर्शवल्यानंतर त्यांनी अशा शब्दांचा प्रयोग करणे तात्काळ थांबवले होते. आपल्या निर्णयात, उच्च न्यायालयाने हे मान्य केले की, अशा शब्दांचा वापर अंतर्गत तक्रार समितीने (ICC) अयोग्य मानला. न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की, या शब्दांना लैंगिक भावनांशी संबंध जोडण्याची गरज नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accident: अपघाताने उद्ध्वस्त केले लग्नाचे स्वप्न; केरये येथे कंटेनरला बुलेटची भीषण धडक, पंढरपूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Oscar 2027: 'श्वास', 'कोर्ट'नंतर आता 'गोंधळ'! 33 तगड्या चित्रपटांना पछाडत ऑस्करसाठी निवड; मिळाले तुफानी रेटिंग

Goa Economy: गोव्याच्या अर्थकारणाचे दिल्लीत 'मंथन'; महसूलवाढ आणि खर्च नियंत्रणावर भर, सरकारने घेतले 100 कोटींचे कर्ज

Spam Call New Rules: फेक आणि स्पॅम कॉल्सला बसणार चाप! ट्रायचा मोठा निर्णय; 'AI'च्या मदतीने स्पॅमर्सवर होणार कडक कारवाई

Horoscope 19 Saptember 2026: शनिवारचा महा-संयोग! बुधादित्य आणि भद्र राजयोगाने चमकणार 'या' राशींचे नशीब; बँक बॅलन्स अचानक वाढणार

SCROLL FOR NEXT