Uttarakhand IRCTC tour packages Dainik Gomantak
देश

उन्हाळ्यात उत्तराखंड फिरायचा प्लॅन करताय? IRCTCने ऑफर केली सुवर्णसंधी

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) एक अतिशय आलिशान आणि परवडणारे टूर पॅकेज पर्यटकांना ऑफर करत आहे.

दैनिक गोमन्तक

तुम्हीही उन्हाळ्याच्या सुटीत उत्तराखंडच्या सुंदर मैदानी भागात फिरण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी येत आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) एक अतिशय आलिशान आणि परवडणारे टूर पॅकेज पर्यटकांना ऑफर करत आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही उन्हाळ्याच्या सुटीत डेहराडून, हरिद्वार, मसुरी आणि ऋषिकेशमध्ये फिरू शकता. हे टूर पॅकेज 4 रात्री आणि 5 दिवसांचे आहे. या पॅकेजमध्ये राहण्याबरोबरच भोजनाची सुद्धा सोय करण्यात आली आहे. (Uttarakhand IRCTC tour packages)

बुकिंग कसे करावे

प्रवासी या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.comला ऑनलाइन भेट देऊन बुकिंग करू शकतात. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. सुविधांचाही समावेश आहे. या IRCTC पॅकेजमधील बोर्डिंग/डिबोर्डिंग हे हैदराबाद आहे. यादरम्यान मसुरीमध्ये 2 रात्री आणि हरिद्वारमध्ये 2 रात्रीचा मुक्काम असेल.

प्रवास कधी सुरू होणार?

या पॅकेजचा प्रवास 27 मे 2022 पासून सुरू होईल आणि 31 मे पर्यंत चालेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता करण्याची गरज नाही. हे पॅकेज तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. सिंगल ऑक्युपन्सीचे भाडे 29730 रुपये प्रति व्यक्ती, डबल ऑक्युपन्सीचे भाडे 24785 रुपये प्रति व्यक्ती, तर ट्रिपल ऑक्युपन्सीचे भाडे प्रति व्यक्ती 23635 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT