IPL 2026 Auction Dainik Gomantak
देश

IPL 2026 लिलाव! 350 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर; 'या' स्टार खेळाडूची अचानक एन्ट्री, मोठी बोली लागणार?

IPL 2026 Auction: आयपीएल २०२६ लिलावाची उलटी गिनती सुरू झाली असून यंदाच्या हंगामातील लिलावाबाबतची मोठी माहिती बीसीसीआयने जाहीर केली आहे.

Sameer Amunekar

आयपीएल २०२६ लिलावाची उलटी गिनती सुरू झाली असून यंदाच्या हंगामातील लिलावाबाबतची मोठी माहिती बीसीसीआयने जाहीर केली आहे. एकूण ३५० खेळाडू लिलावात आपले नशीब आजमावणार असून १६ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजता अबू धाबीतील एतिहाद अरेना येथे हा बहुचर्चित लिलाव पार पडणार आहे. सर्व फ्रँचायझींशी झालेल्या चर्चेनंतर बीसीसीआयने अंतिम खेळाडूंची सूची प्रसिद्ध केली असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सुरुवातीला बीसीसीआयने तब्बल १,३५५ खेळाडूंची विस्तृत यादी तयार केली होती. त्यानंतर प्रत्येक फ्रँचायझीला आपल्या पसंतीचे खेळाडू सुचवण्यास सांगण्यात आले. मिळालेल्या प्रतिसादानंतर शॉर्टलिस्टिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आणि अखेर ३५० खेळाडूंचा अंतिम पूल निश्चित करण्यात आला. या अंतिम यादीत ३५ नवीन नावे समाविष्ट आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत आहे दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकचा पुनरागमनाचा निर्णय.

विशेष म्हणजे डी कॉकचे नाव सुरूनातीला बीसीसीआयच्या यादीत नव्हते. मात्र एका फ्रँचायझीच्या शिफारशीनंतर त्याचा समावेश करण्यात आला. नुकतेच विशाखापट्टणममध्ये भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात धमाकेदार शतक झळकावत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले.

यानंतर त्याने आयपीएलमध्येही परतण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या लिलावासाठी त्याची बेस प्राइस ₹१ कोटी ठेवण्यात आली आहे, जी मागील मेगा लिलावात निश्चित केलेल्या ₹२ कोटींपेक्षा निम्मी आहे. गेल्यावेळी केकेआरकडून खेळणाऱ्या डी कॉकला निराशाजनक हंगामानंतर फ्रँचायझीने सोडले होते.

लिलावात या वेळीही मोठ्या बोलींची अपेक्षा आहे. बीसीसीआयने सांगितले की लिलावाची सुरुवात कॅप्ड खेळाडूंनी होणार असून त्यात फलंदाज, अष्टपैलू, यष्टीरक्षक-फलंदाज, वेगवान गोलंदाज आणि स्पिनर्स असा क्रम असेल. त्यानंतर अनकॅप्ड भारतीय आणि परदेशी खेळाडूंवर बोली लागेल. पहिल्या सेटमध्ये डेव्हॉन कॉनवे, जेक फ्रेझर-मॅकगर्क, सरफराज खान, पृथ्वी शॉ, डेव्हिड मिलर आणि कॅमेरॉन ग्रीन यांसारख्या दमदार नावांचा समावेश आहे. दुसऱ्या सेटमध्ये वेंकटेश अय्यर अष्टपैलूंच्या गटात असेल.

या वर्षीही लिलावात अ‍ॅक्सिलरेटेड राउंड लागू करण्यात येणार आहे. ७१ ते ३५० क्रमांकातील सर्व खेळाडूंवर पहिल्या अ‍ॅक्सिलरेटेड राउंडमध्ये बोली लागेल. त्यानंतर फ्रँचायझींना पुन्हा पाहू इच्छिणाऱ्या खेळाडूंची नावे देण्यास सांगितले जाईल, ज्यामुळे अंतिम टप्प्यात आणखी चुरस वाढण्याची शक्यता आहे.

अंतिम यादीत अनेक दिग्गज परदेशी तसेच प्रतिभावान भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. परदेशी खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक, इंग्लंडचा माइल्स हॅमंड आणि डॅन लॅटिगन, श्रीलंकेचे ट्रेविन मॅथ्यू, बिनुरा फर्नांडो, कुसल परेरा, डुनिथ वेल्लाला तसेच वेस्ट इंडिजचा अकीम ऑगस्टे ही प्रमुख नावे आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये सादेक हुसेन, विष्णू सोलंकी, साबीर खान, ब्रिजेश शर्मा, कनिष्क चौहान, आरोन जॉर्ज, जिक्कू ब्राईट, श्रीहरी नायर, यश डिचोलकर, सागर सोलंकी आणि अमन शेखावत यांसारखी अनेक नवी प्रतिभा लिलावात आपल्या संधीची वाट पाहत आहेत. यामुळे आयपीएल २०२६ चा लिलाव अधिक रंगतदार होणार यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT