International Athlete Suicide Dainik Gomantak
देश

Rohini Kalam Suicide : क्रीडा विश्वात खळबळ! आंतरराष्ट्रीय खेळाडूनं संपवलं जीवन, घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Rohini Kalam Found Dead : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारी जुजुत्सू खेळाडू रोहिणी कलाम (वय ३०) हिने रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं.

Sameer Amunekar

मध्य प्रदेशातील देवास येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारी जुजुत्सू खेळाडू रोहिणी कलाम (वय ३०) हिने रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. ही घटना देवास शहरातील राधागंज परिसरातील अर्जुन नगर येथे घडली. या घटनेने क्रीडा क्षेत्रात आणि स्थानिक समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणीच्या कुटुंबातील सर्वजण त्या वेळी घरी नव्हते. तिची आई आणि बहीण मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या, तर वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी परतल्यावर तिची धाकटी बहीण रोशनी कलाम हिला खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले.

बराच वेळ आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने तिने दरवाजा तोडला असता, आत रोहिणी फासावर लटकलेली आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी अज्ञात कारणांमुळे आत्महत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत रोहिणीची बहीण रोशनीने पोलिसांना सांगितले की, रोहिणी आष्टा येथील एका खाजगी शाळेत मार्शल आर्ट्स कोच म्हणून कार्यरत होती. तिला तेथे काही व्यावसायिक अडचणी येत होत्या. या समस्या तिच्या तणावाचे कारण असू शकतात, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

कुटुंबीयांच्या मते, रोहिणी शनिवारी देवास येथे परतली होती. रविवारी सकाळी तिने नेहमीप्रमाणे चहा व नाश्ता केला आणि काही वेळ फोनवर बोलली. त्यानंतर ती खोलीत गेली आणि दरवाजा आतून बंद केला. काही वेळानंतरच ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.

रोहिणी कलाम ही भारतातील अग्रगण्य जुजुत्सू खेळाडूंपैकी एक होती. तिने १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (हांग्झो) भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच, बर्मिंगहॅम वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये निवड झालेली ती एकमेव भारतीय खेळाडू होती.

तिने २०२२ मध्ये बँकॉक येथे झालेल्या थायलंड ओपन ग्रँड प्रिक्समध्ये ४८ किलो गटात कांस्यपदक जिंकले होते. तसेच २०२४ मध्ये अबू धाबी येथे झालेल्या ८ व्या आशियाई जुजुत्सू चॅम्पियनशिपमध्ये दुहेरी क्लासिक प्रकारात कांस्यपदक मिळवले होते. तिने सौदी अरेबियातील कॉम्बॅट गेम्ससाठी पात्रता मिळवली होती.

रोहिणीने २००७ मध्ये आपल्या क्रीडा कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि २०१५ पासून ती जुजुत्सूमध्ये व्यावसायिक खेळाडू म्हणून सक्रिय होती. तिच्या अकाली मृत्यूने देशातील क्रीडाप्रेमींना मोठा धक्का बसला असून, पोलिसांनी तिच्या मृत्यूमागील नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Most Powerful Year: 2026 शतकातील सर्वात 'शक्तीशाली वर्ष'; सर्वांना होणार मोठा फायदा, ज्योतिषांनी दिले महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

SCROLL FOR NEXT