Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

काँग्रेसमध्ये अंतर्गत धूसफूस; राहुल गांधी मात्र ब्रिटन दौऱ्यावर

केंब्रिज विद्यापीठात 'इंडिया अॅट 75' कार्यक्रमास करणार संबोधित

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा सामान्य नागरिकांसोबतचा संवाद वाढवण्याची गरज आहे. यासाठी काँग्रेसने चिंतन शिबिरात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस भारत जोडो यात्रा सुरू करणार असल्याचे सांगितले. यातच पक्षातील महत्त्वाचे नेते राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकताना दिसत आहेत. यामूळे काँग्रेसमधील अंतर्गत धूसफूस वाढली असताना राहुल गांधी मात्र ब्रिटन दौऱ्यावर जाणार असल्याने पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी लंडनला रवाना झाले आहेत. येथे ते 23 मे रोजी आयडियाज ऑफ इंडिया परिषदेला संबोधित करतील. त्यांचा येथील भारतीय समुदायाला भेटण्याचा कार्यक्रमही आहे. काँग्रेसचे मीडिया विभाग प्रमुख आणि पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 23 मे रोजी केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी 'इंडिया अॅट 75' कार्यक्रमाला संबोधित करतील.

तसेच आयडियाज ऑफ इंडियाचे शुक्रवारी लंडनमध्ये लॉन्चिंग केले जाईल.राहुल गांधी गुरुवारी सायंकाळपर्यंत लंडनला पोहोचतील. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि प्रियांक खरगेही उपस्थित राहणार आहेत. कोविड-19 महामारीच्या काळात प्रवासाबाबत परिस्थिती सामान्य झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आखला असताना दुसरीकडे गुजरात आणि पंजाबमध्ये पक्षात फूट पडत असताना राहुल गांधी विदेश दौऱ्यावर गेल्याने काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT