intelligence agencies & Delhi police on high alert after thread for flag hosting on Parliament of India  Dainik Gomantak
देश

संसदेवर खलिस्तानी झेंडा फडकवण्याची धमकी, राजधानी हाय अलर्टवर

सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः नवी दिल्ली परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे

दैनिक गोमन्तक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी (Parliament Session) राजधानी दिल्लीत (Delhi) कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, शीख फॉर जस्टिस संघटनेकडून धमकीमुळे दिल्ली पोलीस (Delhi Police) तसेच इतर सुरक्षा यंत्रणा राजधानीत हाय अलर्टवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिख फॉर जस्टिस या संघटनेने शेतकर्‍यांना संसदेचा घेराव करून संसदेवर (Parliament Of India) खलिस्तानी झेंडा फडकवण्याची धमकी दिली आहे. एवढेच नाही तर त्यासाठी एक ऑनलाइन व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. यानंतर गुप्तचर यंत्रणांनी दिल्लीत अलर्ट जारी केला आहे. दिल्ली पोलीस आणि इतर यंत्रणांना गुप्तचर यंत्रणांनी सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. (intelligence agencies & Delhi police on high alert after thread for flag hosting on parliament)

सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः नवी दिल्ली परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या युनायटेड किसान मोर्चाच्या शेतकरी संघटनेने 29 मार्च रोजी संसदेकडे जाणारा ट्रॅक्टर मोर्चा दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी सुरक्षा दल तैनात करूनही पुढे ढकलला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संसदेच्या अधिवेशनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांनी आपल्या बाजूने सर्व आवश्यक सुरक्षा व्यवस्था केल्या आहेत. 26 जानेवारी रोजी किसान ट्रॅक्टर मार्चदरम्यान लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसक निदर्शनादरम्यान काही जणांनी गोंधळ घातला होता त्याचबरोबर लाल किल्ल्याच्या तटबंदीवर तिरंग्याशेजारी आणखी एक ध्वज फडकवला गेला होता.

दरम्यान याच पार्शभूमीवर आता संसद भवन,नॉर्थ ब्लॉक,साउथ ब्लॉक,राष्ट्रपती भवन,पंतप्रधानांचे निवासस्थान,गृहमंत्र्यांचे निवासस्थान या साऱ्या ठिकाणांना आता छावणीचे स्वरूप आले आहे. चांदनी चौक, लाजपतनगर, सरोजिनी नगरसह दिल्लीतील प्रमुख बाजारपेठांमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT